"या दिवशी सुट्टीवर किंवा पिकनिकला जाणारे.."; मतदान केल्यानंतर मिलिंद गवळींनी टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 07:00 PM2024-05-20T19:00:02+5:302024-05-20T19:02:00+5:30

मिलिंद गवळींनी त्यांच्या वडिलांसोबत आज मतदान केलं. त्यानंतर त्यांनी लिहिलेली खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे (milind gawali)

milind gawali post for those who going picnic on election day loksabha 2024 mumbai | "या दिवशी सुट्टीवर किंवा पिकनिकला जाणारे.."; मतदान केल्यानंतर मिलिंद गवळींनी टोचले कान

"या दिवशी सुट्टीवर किंवा पिकनिकला जाणारे.."; मतदान केल्यानंतर मिलिंद गवळींनी टोचले कान

मिलिंद गवळींनी यांनी त्यांच्या बाबांसोबत आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात त्यांच्या बाबांसोबत मतदानाचा हक्क बजावला. मिलिंद गवळींनी मतदान केल्यानंतर काही फोटो पोस्ट करुन लिहिलंय, “मतदान” पाच वर्षानंतर परत आपलं मत देण्याचा योग आला,
ज्या वेळेला मत देण्याचा अधिकार मला मिळाला त्या दिवसापासून आजपर्यंत कधीही मतदान करायचं किंवा मत देण्याचं सुकलं नाही, त्याचं कारण म्हणजे माझे वडील
निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री श्रीराम गवळी, मतदानाचे महत्त्व त्यांनी अगदी माझ्या लहानपणापासून माझ्या मनामध्ये कोरून ठेवलं आहे, constitution
ने , घटनेने आपल्या दिलेला हा खूप महत्त्वाचा अधिकार आहे ,असं मला लहानपणापासूनच कळलं होतं, त्यामुळे इतकी वर्ष मी मतदानाच्या दिवशी बिझी जरी असलो तरी सुद्धा मत द्यायला मात्र कधीही चुकलेलो नाही.


मिलिंद गवळी पुढे लिहितात, "माझी आई असताना मतदानाच्या दिवशी खूप धमाल असायची, वडीलांनी अमुक एका व्यक्तीला मत दे असं सुचवल्यावर, आई अगदी त्याच्या विरोधी उमेदवाराला मत देणार असं म्हणायची, आणि वडील तिची आठवडाभर विणवणी करायचे, म्हणायचे “एक मत फुकट जाईल तुझं” “मी सांगतो त्या उमेदवारालाच मत दे”, त्याच पक्षालाच मत दे . मतदान करेपर्यंत ती त्यांना चिडवायची, पण नंतर मतदान करून आल्यानंतर मला हळू सांगायची की “त्यांनी ज्या उमेदवाराला मत द्यायला सांगितलं होतं त्या उमेदवारालाच मी दिले आहे”, फक्त यांची गंमत करते आहे."


मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "मतदानाच्या दिवशी सुट्टीवर किंवा पिकनिकला जाणारे किंवा घरी आळशीपणा करणाऱ्या वर वडील खूप वैतागायचे , अजूनही फोन करून सगळ्यांना आठवण करून देतात, पण आई गेल्यापासून ते आमच्यावर त्यांना योग्य वाटणारा उमेदवार लादत नाहीत, “तुम्हाला जो व्यक्ती योग्य वाटतो त्याला तुम्ही मत द्या, पण मतदान करायचं टाळू नका”, पुन्हा आज पण दरवेळेस सारखं मतदान केल्याबद्दल त्यांनी मला हजार रुपये बक्षीस दिलं. वयाच्या 85 व्या वर्षी सुद्धा इतक्या उत्साहात सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर त्यांचं मत देण्यासाठी हजर होते. 55 ते 60 टक्के जे मतदान होतं त्यात माझ्या वडिलांसारख्या लोकांमुळे आपला देश योग्य नेत्यांच्या हातात जातो, चाळीस पंचेचाळीस टक्के जे लोक मतदान करत नाहीत ते आपल्या देशाचं दुर्दैव आहे.त्यातले खूप कमी लोकं genuine कारणामुळे मतदान करत नाहीत, पण त्यातले बरेचसे लोक वीकेंड बघून picnic ला निघून गेलेले असतात. मी माझ्या वडिलांच्या वतीने तुम्हा सगळ्यांना मतदान करण्याचा आग्रह करतो, संध्याकाळी पाच वाजेच्या आत जाऊन मतदान करा."

Web Title: milind gawali post for those who going picnic on election day loksabha 2024 mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.