"आणखी त्रास झाला कारण..."; छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात गेल्यावर मिलिंद गवळींनी सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:26 IST2025-02-05T11:25:55+5:302025-02-05T11:26:58+5:30

मिलिंद गवळींनी नुकतंच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयाला भेट देऊन तिथला अनुभव शेअर केलाय (milind gawali)

milind gawali visit chhatrapati shivaji maharaj museum in mumbai and share experience | "आणखी त्रास झाला कारण..."; छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात गेल्यावर मिलिंद गवळींनी सांगितला अनुभव

"आणखी त्रास झाला कारण..."; छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालयात गेल्यावर मिलिंद गवळींनी सांगितला अनुभव

'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळींनी (milind gawali) नुकतंच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला भेट दिली. तिथे आलेला अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.  मिलिंद गवळी लिहितात, "या वस्तूसंग्रहालयाचं नाव आधी होतं प्रिन्स ऑफ व्हील्स म्युझियम, 103 वर्षांपूर्वी हे म्युझियम बांधलं होतं, 10 जानेवारी 1922 साली याचं उद्घाटन झालं, इंग्रजांनी हे बांधलं होतं, त्यांनी नंतर गेटवे ऑफ इंडिया बांधलं, मुंबई हायकोर्ट बांधलं, दिल्लीला इंडिया गेट बांधलं, राष्ट्रपती भवन पण त्यांनी बांधलं, मुंबई मुनिसिपल कॉर्पोरेशनची बिल्डिंग, क्रॉफर्ड मार्केट, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई युनिव्हर्सिटी ची बिल्डिंग, त्या वेळचं इतकं सुंदर architectural आणि आजही भक्कम बांधकाम."


"परवा काला घोडा फेस्टिवलला गेलो आणि या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात पण गेलो, या वास्तू बघून फारच भारी वाटतं, या ब्रिटिशांच्या आधी, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधलेत, आजही किल्ल्यांवर गेलं की खूपच भारी वाटतं, इतिहास डोळ्यासमोर येतो, त्या काळात इतकं भव्य दिव्य बांधकाम कसं केलं असेल याची कल्पना सुद्धा करता येत नाही."

"या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये 50 हजार होऊन अधिक पुरातन काळातल्या वस्तू आहेत, त्यातला एक भाग आहे पूर्वीच्या चलनातल्या नाणी, त्याच्यामध्ये मी शिवाजी महाराजांच्या काळाची "होण", नाणी पाहिली, सुवर्णमुद्रा बघायला मिळाली, मी महाराजांच्या काळाच्या या सुवर्णमुद्रा पहिल्यांदाच पाहिल्या, या आधी मी या संग्रहालयात गेलो होतो पण, त्यावेळेला 'होण'पाहिल्याच माझ्या स्मरणात नाहीये, पण पूर्वच्या मोहींजोदारो, मोगल, ब्रिटिश, छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी पाहून मला फारच भारी वाटलं, त्याकाळचे दागिने, मुर्त्या, गौतम बुद्धाच्या, आपला देव देवतांच्या मुर्त्या, पुरातन काळातले चित्र, त्यांचे वस्त्र, काही वस्तू तर रतन टाटा यांनी या संग्रहालयाला गिफ्ट दिलेले आहेत, त्या पण इथे बघायला मिळाले, दरवेळेला हे वस्तुसंग्रहालय बघायला येतो आणि वेगळाच अनुभव मिळतो, या वस्तू संग्रहालयातल्या वस्तू तुम्हाला वेगळा विश्वात घेऊन जातात."



"यावेळेला माझ्याबरोबर दिपा होती, ती पहिल्यांदा हे वस्तुसंग्रहालय बघत होते, ती पण खूपच भारावून गेली होती, आम्ही शाळेतल्या मुलांसारख्या पूर्वीच्या जुन्या जुन्या वस्तू पाहत होतो, पण हे सगळं पाहून एका गोष्टीची खूप खंत वाटत होती की ह्या ब्रिटिशांनी आपल्याला देशातल्या किती सुंदर मौल्यवान वस्तू लुटून नेल्या आहेत, आपल्या कोहिनूर हिऱ्याचं रिप्लीका dummy ईथे ठेवलेला आहे. ते बघून तर आणखीन त्रास झाला. आपला हिंदुस्तान किती समृद्ध होता याची पण जाणीव झाली. ज्यांनी कोणी हे पाहिलं नसेल त्यांनी जरूर बघावं ,शाळेतल्या मुलांनी नक्की बघावं."

Web Title: milind gawali visit chhatrapati shivaji maharaj museum in mumbai and share experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.