‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ फेम ​खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमानने अभिनयासोबतच सुरू केले हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 07:33 AM2018-05-26T07:33:04+5:302018-05-26T13:03:04+5:30

उत्कृष्ट कथा आणि दिग्गज कलाकार यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. ...

'Miriam Khan- Reporting Live' by Fame Khalid Siddiqui and Rukhsar Rahman playing with Abhinay | ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ फेम ​खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमानने अभिनयासोबतच सुरू केले हे काम

‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ फेम ​खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमानने अभिनयासोबतच सुरू केले हे काम

googlenewsNext
्कृष्ट कथा आणि दिग्गज कलाकार यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. मालिकेतील खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमान या दिग्गज कलाकारांची मातृभाषा उर्दू असल्याने त्यांनी ती मालिकेतील अन्य कलाकारांना या मालिकेसाठी ही भाषा शिकविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मालिकेतील खालिद सिद्दिकी आणि रुख्सार रेहमान हे जुन्या नबाबी घराण्यातील असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची मातृभाषा उर्दू दाखविण्यात आली आहे. पण मालिकेतील काही कलाकारांसाठी उर्दू ही नवी भाषा असून या भाषेतील काही शब्द त्यांना कळत नाहीयेत. तसेच काही शब्दांचे उच्चार कऱणे त्यांच्यासाठी कठीण जात आहे. 
प्रियांका कंडवाल आणि शीना बजाज ‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेत खालिद आणि रुख्सार यांच्या मुलींची व्यक्तिरेखा साकारत आहेत. त्यांचे हे ऑनस्क्रीन माता-पिता सध्या या दोघींना चित्रीकरणाच्या दरम्यान उर्दू भाषेचे धडे देत आहेत. याविषयी खालिद सांगतो, “आम्ही नुकतंच भोपाळमध्ये चित्रीकरण पार पाडलं. पण ते विविध स्थळांवर करण्यात आल्याने आम्हाला चित्रीकरणाच्या दरम्यान भरपूर मोकळा वेळ मिळत असे. यामुळे आमचे सहकलाकार आणि मालिकेतील आमच्या कुटुंबातील सदस्य दाखवलेल्या कलाकारांची ओळख करून घेण्यास आम्हाला संधी मिळाली. मी आणि रुख्सार हे उर्दूत पारंगत असल्याने प्रियांका आणि शीना यांना त्या भाषेचे धडे देण्यास आम्ही सुरुवात केली आहे. त्यांना आम्ही उर्दूतील अनेक शब्द, वाक्प्रचार आणि वाक्ये शिकविली आहेत.”
‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ ही मालिका स्टार प्लसवर नुकतीच सुरू झाली असून प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडे सात वाजता पाहायला मिळत आहे. या मालिकेची कथा ही खूप वेगळी असल्याने अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. मरियम खान रिपोर्टिंग लाइव्ह मालिकेत नऊ वर्षांची चिमुरडी देशना दुगड मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. भोपालच्या पार्श्वभूमीवर या मालिकेची कथा असून या मालिकेपूर्वीही देशनाने 'इस प्यार को क्या नाम दूँ' आणि 'बाल कृष्ण' या मालिकेत काम केले आहे. 

Also Read : ​पुरुषांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारावर भाष्य करणाऱ्या चित्रपटात खलिद सिद्धीकी साकारणार ही भूमिका

Web Title: 'Miriam Khan- Reporting Live' by Fame Khalid Siddiqui and Rukhsar Rahman playing with Abhinay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.