‘मिस युनिव्हर्स’ झाल्यावर हरनाजनं पहिला कॉल कुणाला केला माहितीये? कपिल शर्माच्या ‘बुआ’ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 01:53 PM2021-12-14T13:53:40+5:302021-12-14T13:56:28+5:30

Miss Universe 2021 Harnaaz Sandhu : होय, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये  (The Kapil Sharma Show) कधीकाळी बुआची भूमिका साकारणा-या उपासना सिंगला (Upasana Singh) हरनाजने पहिला कॉल केला. उपासनासोबत हरनाजचं खास कनेक्शन आहे. 

miss universe 2021 harnaaz sandhu close relation with he kapil sharma show fame upasana singh | ‘मिस युनिव्हर्स’ झाल्यावर हरनाजनं पहिला कॉल कुणाला केला माहितीये? कपिल शर्माच्या ‘बुआ’ला

‘मिस युनिव्हर्स’ झाल्यावर हरनाजनं पहिला कॉल कुणाला केला माहितीये? कपिल शर्माच्या ‘बुआ’ला

googlenewsNext

तब्बल 21 वर्षांनी भारतानं मानाचा समजला जाणारा ‘मिस युनिव्हर्स’ (Miss Universe 2021) हा खिताब आपल्याकडे खेचून आणला. चंदीगडच्या हरनाज संधून (Harnaaz Sandhu) ‘मिस युनिव्हर्स’चा ताज जिंकला आणि हा ताज जिंकल्यानंतर हरनाजने पहिला कॉल कुणाला केला होता माहितीये? तर कपिल शर्माच्या ‘बुआ’ला. होय, ‘द कपिल शर्मा शो’मध्ये  (The Kapil Sharma Show) कधीकाळी बुआची भूमिका साकारणा-या उपासना सिंगला (Upasana Singh) हरनाजने पहिला कॉल केला. उपासनासोबत हरनाजचं खास कनेक्शन आहे. 

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत खुद्द उपासनाने हा खुलासा केला. तिने सांगितले, ‘इस्रायलला मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी जाण्याआधी हरनाज काही दिवस माझ्यासोबत राहिली होती. एकदा तिने माझ्यासाठी राजमा चावल केला होता. मी मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकणार, असं ती मला मोठ्या आत्मविश्वासानं म्हणायची आणि तिनं ही गोष्ट खरी ठरवली. ताज जिंकल्यानंतर तिने पहिला कॉल मला केला होता. मी माझा शब्द खरा करून दाखवला, असं ती ओरडून ओरडून मला सांगत होती. तिचा आनंद मला जाणवत होता. तिच्यासोबत बोलल्यानंतर मी सुद्धा भावुक झाले होते. अश्रू अनावर झाले होते. हरनाज जेव्हा केव्हा मुंबईत येते, ती माझ्याकडे मुक्कामाला असते. मिस इंडियानंतर तिचं ट्रेनिंग सुरू झालं तेव्हा ती 5 दिवस आमच्यासोबत होती. इस्रायलवरून भारतात आल्यानंतरही ती सर्वप्रथम माझ्या घरी येणार आहे. ’

उपासनाच्या दोन चित्रपटात दिसणार हरनाज
उपासना सिंग तिच्या मुलाच्या चित्रपटासाठी कास्टिंग करत असताना ती सर्वप्रथम हरनाजला भेटली होती. हरनाज तिच्या आईसोबत ऑडिशनला आली होती. हरनाज पहिल्याच नजरेत उपासनाला आवडली आणि तिने तिला दोन चित्रपटांसाठी साईन केलं. आता ‘मिस युनिव्हर्स’ हरनाज उपासनाचा मुलगा नानकच्या दोन चित्रपटांची हिरोईन म्हणून दिसणार आहे.

Web Title: miss universe 2021 harnaaz sandhu close relation with he kapil sharma show fame upasana singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.