मंदार देवस्थळीला 'मनसे' आधार; शर्मिष्ठा राऊतच्या आरोपानंतर बचावासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 03:08 PM2021-02-23T15:08:44+5:302021-02-23T15:14:42+5:30

मंदार देवस्थळीसारख्या एकट्या-दुकट्या निर्मात्याला लक्ष्य करून काही साध्य होणार नाही असे मनसेचे नेते अमेय खोपकर यांचे म्हणणे आहे.

mns leader amey khopkar supports mandar devasthali in sharmishtha raut financial dispute | मंदार देवस्थळीला 'मनसे' आधार; शर्मिष्ठा राऊतच्या आरोपानंतर बचावासाठी पुढाकार

मंदार देवस्थळीला 'मनसे' आधार; शर्मिष्ठा राऊतच्या आरोपानंतर बचावासाठी पुढाकार

googlenewsNext
ठळक मुद्देअमेय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, कोरोना काळात मनोरंजनविश्वाला जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्याचं गांभीर्य आता सर्वांच्या लक्षात यायला लागलेलं आहे.

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. त्या आरोपावर मंदार यांनी देखील आपली बाजू मांडली होती. आता या वादात मनसेने उडी घेतली आहे. मंदार देवस्थळीसारख्या एकट्या-दुकट्या निर्मात्याला लक्ष्य करून काही साध्य होणार नाही असे मनसेचे नेते अमेय खोपकर यांचे म्हणणे आहे.

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांना एकत्र राहाण्याचा सल्ला दिला आहे. अमेय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, कोरोना काळात मनोरंजनविश्वाला जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्याचं गांभीर्य आता सर्वांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. सोशल मीडियावरुन त्याची जाहीर चर्चा करून काही निष्पन्न होईल, याची शक्यता कमीच आहे. मंदार देवस्थळीसारख्या एकट्या-दुकट्या निर्मात्याला लक्ष्य करून काही साध्य होणार नाही. मंदारसारखेच इतरही बरेच टीव्ही निर्माते आर्थिक अडचणीत आहेत आणि त्याचा फटका कलाकार-तंत्रज्ञ सर्वांनाच बसतोय. 


कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे दूर झालेलं नाही. अशा या काळात सामंजस्याने वागून मध्यम मार्ग कसा काढता येईल यादृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. लवकरच मराठी टीव्ही निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ आणि चॅनल अधिकारी यांच्याबरोबर ‘झूम’ बैठक करण्याची योजना आहे. 
या परिस्थितीतून तोडगा काढता आला तर चांगलंच आहे, पण त्याहीपेक्षा एकत्र चर्चेनंतर गढूळ वातावरण जरी पूर्ववत झालं तरी पुरेसं आहे. 
कोरोनामुळे आपली एकी भंग व्हायला नको. एकत्र येऊया आणि या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करुया...

कोरोनाकळात मनोरंजनविश्वाला जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्याचं गांभीर्य आता सर्वांच्या लक्षात यायला लागलेलं आहे. सोशल...

Posted by Ameya Khopkar on Monday, February 22, 2021

अमेय खोपकर यांची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून अमेय यांनी व्यक्त केलेले मत अगदी बरोबर असल्याचे मत मराठी इंडस्ट्रीतील लोक तसेच सामान्य  लोक कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. 

Web Title: mns leader amey khopkar supports mandar devasthali in sharmishtha raut financial dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.