पहिलीच मालिका अन् लाखोचं मानधन; मोना सिंहला 'जस्सी जैसी..'साठी मिळालं होतं इतकं तगड मानधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 01:13 PM2024-02-10T13:13:10+5:302024-02-10T13:14:39+5:30
Mona singh: त्यावेळी मोनाला दिवसागणिक पैसे मिळत नव्हते. त्याऐवजी तिला पॅकेज मिळालं होतं.
बॉलिवूडमध्ये अभिनेत्री मोना सिंह (mona singh) हिने तिचं स्थान निर्माण केलं आहे. अनेक गाजलेल्या सिनेमा, पुरस्कार सोहळ्यांमध्ये मोनाच्या नावाची चर्चा असते. मात्र, मोनाने छोट्या पडद्यापासून तिच्या करिअरची सुरुवात केली. यात जस्सी जैसी कोई नहीं ही तिची मालिका प्रचंड गाजली. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. मात्र, या मालिकेसाठी तिला अत्यंत किरकोळ मानधन मिळालं होतं. विशेष म्हणजे तिचं मानधन ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
अलिकडेच मोनाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने जस्सी जैसी कोई नहीं या मालिकेसाठी तिला नेमकं किती मानधन मिळालं होतं हे तिने सांगितलं आहे. मुंबईत आल्यानंतर जवळपास २ वर्ष ऑडिशन दिल्यानंतर मला जस्सी जैसी कोई नहीं ही मालिका मिळाली होती. त्यावेळी मला प्रोडक्शन हाऊसने नाही तर सोनी टीव्हीने कामावर घेतलं होतं. तेव्हा मला मिळालेलं मानधन थक्क करणारं होतं. कारण, 'मला त्यावेळी दिवसागणिक पैसे मिळाले नव्हते. तर त्याऐवजी पॅकेजच्या आधारावर पगार दिला होता', असं मोना म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्यावेळी मला १.५ लाख रुपये प्रति महिना पगार दिला जात होता. ज्यावेळी मला हा पगार ऑफ झाला त्यावेळी मी सरळ एसटीडी बूथवर गेले. माझ्या फोनची बॅटरी संपली होती. त्यामुळे मी एसटीडीवरुन त्यांना फोन केला. मी फोन केल्यावर रडायला लागले आणि मला किती पगार मिळाला ते सांगितलं. ही रक्कम ऐकून माझ्या आईला सुद्धा धक्का बसला होता. आई म्हणाली, माझी छोटू आता इतकं कमावणार", असं म्हणत मोनाने तिची आठवण शेअर केली.
दरम्यान, ही मालिका सुरु असताना अचानकपणे चॅनेल हेडने तिला बोलावलं आणि तिचा पगार आणखी २ लाखांनी वाढवला असंही तिने सांगितलं. त्यामुळे या मालिकेसाठी जवळपास तिला साडे तीन लाख रुपये मिळत होते.