“पतीला परमेश्वर मानायचा ट्रेंड संपला”; ‘जस्सी जैसी कोई नहीं’ फेम मोना सिंगचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 09:21 AM2023-09-27T09:21:25+5:302023-09-27T10:01:42+5:30
‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंग तिच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आली आहे.
‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री मोना सिंग. मोनाने थ्री इडियट्स', 'लाल सिंग चड्ढा' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोना विविध मुद्द्यांवर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं. भारतीय संस्कृती आणि समाजात पतीला परमेश्वर आणि देव मानण्याची परंपरा योग्य नाही, असं तिने म्हटलंय. तिच्या या वक्तव्यामुळे सध्या ती चर्चेत आली आहे.
'जस्सी जैसी कोई नहीं' या प्रसिद्ध मालिकेला 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोना सिंगने 'अमर उजाला'ला एक खास मुलाखत दिली. यात ती म्हणाली, '२० वर्षे झाली पण मला असे वाटते की हे सगळं काल घडले. या शोने मला खूप लोकप्रियता मिळवून दिली. मला अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. मी जे काही शिकले ते जस्सीच्या शूटिंगदरम्यान शिकले.''
पुढे मोना म्हणाली, “मी जेव्हा ‘क्या हुआँ तेरा वादा’ मालिकेत काम तेव्हा बऱ्याच महिलांना माझ्या भूमिकेतून प्रेरणा मिळाली. जेव्हा एखादी महिला कठीण प्रसंगातून पुन्हा उभी राहते तेव्हा ती पूर्वीपेक्षा जास्त कणखर असते. अनेक वर्षांपासून महिलांना दबावाखाली ठेवलं गेलंय. हे करू नका, ते करू नका, बाहेर जाऊ नका असे सांगितले जाते. पतीला देव मानायचा. पण, आता हा ट्रेंड संपतोय आहे. आता महिलांसोबत काहीही चुकीचं घडलं तर त्या स्वत: त्याविरोधात उभे राहून लढू शकतात.”
मोना सिंगने 27 डिसेंबर 2019 रोजी श्याम राजगोपालनसोबत लग्नगाठ बांधली होती. त्याआधी 5 वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते. मोनाचा नवरा साऊथ इंडियन बँकर आहे.