नजरमधील भूमिका साकारण्यासाठी मोनालिसा झाली उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 01:38 PM2018-07-26T13:38:13+5:302018-07-26T15:17:39+5:30

अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका रंगवीत असून ते या डायनची शक्ती किती ताकदवान आहे, ते उघड करतील. अशाच एका नामवंत अभिनेत्रीचे नाव आहे मोनालिसा बिस्वास

Monalisa became interested to play the role in the nazar | नजरमधील भूमिका साकारण्यासाठी मोनालिसा झाली उत्सुक

नजरमधील भूमिका साकारण्यासाठी मोनालिसा झाली उत्सुक

googlenewsNext

आपल्या सर्वांच्या मनात एक भीती सदैव वसलेली असते- ती म्हणजे कुणा दुष्ट, सैतानी शक्तीची वाईट नजर आपल्यावर पडेल, ही. ‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ या आगामी मालिकेची संकल्पना याच भावनेवर बेतलेली आहे. या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची (हडळीची) नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखविण्यात आले आहे. यात अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिका रंगवीत असून ते या डायनची शक्ती किती ताकदवान आहे, ते उघड करतील. अशाच एका नामवंत अभिनेत्रीचे नाव आहे मोनालिसा बिस्वास.

‘नजर’द्वारे हिंदी काल्पनिक मालिकांमध्ये पदार्पण करणारी ही बंगाली अभिनेत्री सांगते, “या मालिकेत एका डायनची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाल्याने मी अतिशय उत्साहित झाले आहे. या मालिकेतील काही अमानवी घटना आणि प्रसंग हे कोणत्या तरी दुर्गम ठिकाणी घडत नसून ते माणसंनी गजबजलेल्या शहरी वस्त्यांमध्ये आणि आजच्या काळात घडतात. यातील मोहनाचे सैंदर्य आणि तिच्या रूपाभोवती असलेल्या वलयामुळे मी या भूमिकेकडे आकर्षिले गेले. तिच्या आरस्पानी सौंदर्यामुळे पुरुष घायाळ होतात आणि दुसर्‍्यांना संमोहित करण्याच्या शक्तीमुळे ती इतरांकडून तिला हवी ती कामं करवून घेते. अशी ही व्यक्तिरेखा आणि तिच्यातील विविध खुब्या कथानकाच्या प्रत्येक भागात हळूहळू साकार करताना मला खूप आनंद होईल.”

मोनालिसाला भोजपुरी चित्रपटांमध्ये प्रचंड मागणी असून तिने आजवर अनेक भोजपुरी तसेच काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता प्रेक्षकांना ती एका वेगळ्याच रूपात आणि भूमिकेत पाहायला मिळेल.

Web Title: Monalisa became interested to play the role in the nazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.