मालिकेच्या सेटवर माकडांचा धुमाकूळ, मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 11:55 IST2025-02-17T11:54:13+5:302025-02-17T11:55:06+5:30
Mrunali Shirke : मृणाली शिर्के हिने इंस्टाग्रामवर मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती दिसते आहे आणि तिच्यामागे माकडे आणि त्याची पिल्ले इथून तिथून पळताना दिसत आहेत.

मालिकेच्या सेटवर माकडांचा धुमाकूळ, मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ
बऱ्याचदा मालिकेच्या सेटवर माकडे किंवा बिबट्या शिरल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. अशावेळेला सेटवर सर्वांची तारांबळ उडते. नुकतेच एका हिंदी मालिकेच्या सेटवर माकडांनी धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. त्यांचा व्हिडीओ मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे मृणाली शिर्के (Mrunali Shirke). मृणाली सध्या 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisi Ke Pyaar Mai) मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्ये काम करते आहे. या मालिकेत ती जुहीची भूमिका साकारते आहे. या मालिकेचा सेट फिल्मसिटीमध्ये आहे.
अभिनेत्री मृणाली शिर्केने प्रेमाची गोष्ट मालिकेत काम केले होते. तिने या मालिकेत मिहिकाची भूमिका साकारली होती. मिहूच्या भूमिकेतून तिला खूप प्रेम मिळाले होते. मात्र तिने अचानक मालिकेला रामराम केला. त्यानंतर तिने बऱ्याच काळानंतर मालिकेत कमबॅक केले. सध्या ती स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका गुम है किसी के प्यार मेंच्या तिसऱ्या सीझनमध्ये काम करते आहे. या मालिकेचा सेट फिल्मसिटीत आहे. ती शूटिंग सेटवरून चाहत्यांना अपडेट देताना दिसते. मात्र नुकतेच तिने मालिकेच्या सेटवरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मृणाली शिर्के हिने इंस्टाग्रामवर मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती दिसते आहे आणि तिच्यामागे माकडे आणि त्याची पिल्ले इथून तिथून पळताना दिसत आहेत. तिने या व्हिडीओवर कॅप्शन लिहिले की, फिल्मसिटीत कसे शूटिंग केले जाते. या व्हिडीओसोबत 'ये मौसम का जादू है मितवा...' हे गाणे लावले आहे. तिने या व्हिडीओसोबत कॅप्शन लिहिले आहे की, ''कौन किस की नगर में है?'' मृणालीच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहते या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत.