दर्शकांना टीव्हीवर निवडण्यासाठी बरेच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2016 05:47 PM2016-11-12T17:47:03+5:302016-11-12T17:47:03+5:30

वीरेंद्रकुमार जोगी घरात बायको जेव्हा नवºयाला आवाज देत ‘अहो ऐकलंत का? असं म्हणते, तेव्हा नवरा कोणत्या ना कोणत्या कारणाने ...

More to select viewers on TV | दर्शकांना टीव्हीवर निवडण्यासाठी बरेच काही

दर्शकांना टीव्हीवर निवडण्यासाठी बरेच काही

googlenewsNext

/>वीरेंद्रकुमार जोगी

घरात बायको जेव्हा नवºयाला आवाज देत ‘अहो ऐकलंत का? असं म्हणते, तेव्हा नवरा कोणत्या ना कोणत्या कारणाने पळवाटा शोधताना दिसतो. पती-पत्नीच्या याच हलक्या फुलक्या भांडणाचा आधार घेत एका वाहिनीवर एक मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत पतीपत्नी एकमेकांची पोलखोल करताना दिसणार आहेत. या रिअ‍ॅलिटी शोचे संचालन प्रणोती प्रधान करणार आहे. लग्न झालेल्या जोडप्यांना ती बोलते करणार आहे. त्याच्यासोबत काही खेळही खेळणार आहे. या शोच्या निमित्ताने प्रणोतीने सीएनएक्शी संवाद साधला. टीव्हीवर बदलत्या स्वरूपासोबतच आपल्या खाजगी आयुष्यावरही ती बोलली. 

प्रश्न : पश्चिमेकडील देशांच्या तुलनेत आपल्या देशात लग्नं ही बरीच वर्षे चालतात. दोघांमधील कोणते बंधन एकमेकांना बांधून ठेवत असेल?
प्रणोती : आपल्याकडील संस्कृती अशी आहे की आपल्याला लहानपणापासून लग्ने निभवायची असतात असे सांगितले जाते. हे एका दृष्टीने चांगले आहे. आपण एकमेकांना जाणून घेतो. त्यांच्यासोबत राहतो, सुख-दु:खे ही दोन्ही समान अनुभवतो. अनेकांना आपण लिव्ह-इनमध्ये राहावे असे वाटते. पाश्चिमात्य देशात सुद्धा आता लग्ने दीर्घ काळ टिकावी असे वाटू लागलेय. हा आपल्या लग्नसंस्थेवर दाखविला जाणारा विश्वास आहे. 

प्रश्न : आज पती- पत्नी दोघेही नोकरी करतात. आपआपल्या कामाचा ताण सांभाळून, लग्न सांभाळून ठेवणे कठीण नाही का? 
प्रणोती : एकमेकांना सांभाळणे यालाच तर आपण सर्वजण प्रेम म्हणतो, पती- पत्नी कबूल करीत नसले तरी ते दोघांत असतेच. पती-पत्नीला एकमेकांसमोर आपल्या भावना मांडण्याची वेळ मिळत नाही. पण ते दोघात असते म्हणूनच दोघेही सोबत राहू शकतात. हे किती कठीण आहे हेच आम्ही आमच्या शो ‘अजी सुनते हो’मधून दाखविणार आहोत. 

प्रश्न : काही लोकांचे एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअर्स असतात, ते कसे सांभाळत असतील याचा उलगडा तुमच्या आगामी शो मधून होणार आहे का?
प्रणोती : आम्ही आमच्या शोमध्ये सर्व सामान्य कपल्सना बोलाविणार आहोत, हा हलका फुलका नॉन फिक्शन शो आहे. यात एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअर्स असलेल्या लोकांना एंट्री नाही. आम्हाला कॉन्ट्राव्हर्सी नको आहे. आपल्या खाजगी आयुष्याविषयी कुणीच बोलणार नाही असे मला वाटते. लोक आपली एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअर्स कसे सांभाळतात हे सांगणे मलाही कठीण आहे. माझे तर लग्नही झाले नाही. 

प्रश्न : तुम्ही आपल्या लग्न कसे करणार? कुणी वर शोधलाय का? 
प्रणोती : सध्या मी सिंगल आहे. पण माहिती नाही कसे करणार, पण मी लग्नाचा तो लाडू खाणारच आहे. एखादा चांगला वर मिळाला की मी ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर करेल. लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज मला लग्न करायचेच आहे. सध्या तरी मी कुणाच्या शोधात आहे असेच म्हणावे लागेल. 

प्रश्न : या कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही प्रोजेक्टवर काम करीत आहेस का? 
प्रणोती : सध्या तरी नाही. आमचा हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार प्रसारित होणार असल्याने सध्या त्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी १०० टक्के प्रयत्न करणार आहे. 

प्रश्न : टीव्हीवर बरेच बदल होत आहे हे बदल तुला कसे वाटतात? 
प्रणोती : मनोरंजनाचे साधन कोणतेही असो बदल हा गरजेचाच आहे. टीव्हीवर होणारे बदल पाहता असे वाटते की आपण पुन्हा मागे जात आहोत का? पण ट्रेन्ड तसाच असोत जुन्या गोष्टी नव्या रुपात येतात. काही गोष्टी जुन्या आहेत तर काही नवीन काही नवीन प्रयोगही केले जात आहेत. सध्या टीव्हीवर सर्वांसाठी शो आहेत असे मला वाटते. नवीन गोष्टींचे स्वागत केले जाते. मला वाटते, भारतीय टीव्ही एक झेप घेत आहे. दर्शकांना निवडण्यासारखे बरेच काही आहे. हे खरोखरच खूप चांगले आहे. 



Web Title: More to select viewers on TV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.