मोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 10:01 AM2018-04-26T10:01:24+5:302018-04-26T15:31:24+5:30

एकामागोमाग एक अशा चार्टबस्टर्स नंतर निकलोडियन या भारतातील लहान मुलांच्या फेव्हरेट वाहिनी ने आता आपल्या मोटू पतलू या प्रसिध्द ...

Motu Paltoo In The City Of Gold Motocyte With This Summer | मोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात

मोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड सह मोटू पतलूचे या उन्हाळ्यात

googlenewsNext
ामागोमाग एक अशा चार्टबस्टर्स नंतर निकलोडियन या भारतातील लहान मुलांच्या फेव्हरेट वाहिनी ने आता आपल्या मोटू पतलू या प्रसिध्द जोडीला घेऊन आपल्या पंधराव्या टेलिव्हिजन करता तयार केलेल्या मोटू पतलू इन द सिटी ऑफ गोल्ड मुव्ही ची घोषणा केली आहे.या नवीन साहसामध्ये मोटू पतलू कंग इन द सिटी ऑफ गोल्ड साठी काम करत असून अधिक साहस, अजून अधिक मूव्ह्ज आपल्याला या चित्रपटांत पहायला मिळणार असून याचा प्रिमियर रविवार २९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता केवळ निकलोडियन पहायला मिळणार आहे.या चित्रपटांत मोटू पतलू शी जगांतील सर्वांत मोठा घोडेस्वार आणि देशांतील सर्वांत श्रीमंत नवाब दिलावर खान आणि त्यांची पत्नी गुल बकावली हे दोघे त्यांच्या कुटूंबातील पिढीजात मालकी असलेल्या सोन्याच्या डोंगराचा शोध घेण्यासाठी संपर्क साधतात.पण कुठेतरी काहीतरी समस्या आहे.दिलावर खान आणि गुल बकावली यांच्या कृतीत काहीतरी गोंधळ आहे. हा सापळा काय आहे ? मोटू पतलूं वर कोणते संकट येणार आहे ? अशा सगळ्या रंजक गोष्टी यंदा चिमुकले अनुभवतील

देशभरातील मुलांना प्रेरणा देण्यासाठी डिस्कव्हरी इंडियाने इंडियन कौन्सिल फॉर चाईल्ड वेल्फेअर नॅशनल ब्रेव्हरी अॅवॉर्ड्‌ससोबत भागीदारी केली आहे. ह्या सहकार्याचा एक भाग म्हणून डिस्कव्हरी  किड्‌स आयसीसीडब्लू नॅशनल ब्रेव्हरी अॅवॉर्ड (आयसीसीडब्लू एनबीए) विजेत्यांच्या जीवनातील सत्यघटनांवर आधारित खास लिटल सिंघम एपिसोड प्रसारित करतील. दोन मुले - सोनू माली (राजस्थान) आणि शिवमपेट रूचिता (हैदराबाद) यांना अनुक्रमे आयसीसीडब्लू एनबीए अॅवॉर्ड्‌स २०१६ आणि २०१५ साली मिळाले होते. हे दोघे ह्या समयी उपस्थित होते.

अव्वल दिग्दर्शक, निर्माता आणि लिटल सिंगमचे मार्गदर्शक रोहित शेट्टी यांनी लिटल सिंघमच्या पत्रकार परिषदेच्या वेळेस मुंबई पोलीसदलातील काही निवडक पोलीस अधिकाऱ्यांची मुलांसोबत छान समय व्यतीत केला.“प्रत्येकच लहान मुलाच्या मनामध्ये सुपरहीरो बनण्याची इच्छा असते आणि गरज पडल्यास त्यांना दुसऱ्यांना मदत करायची असते ह्या गोष्टीवर आधारित लिटल सिंघमची संकल्पना बनवण्यात आली होती. लिटल सिंघम हा एक धैर्यशाली छोटा सुपर कॉप असून ह्या मनोरंजन अॅनिमेशन सीरीजमध्ये तो आपल्या मिर्ची नगरमधील रहिवाशांचे सर्व वाईट शक्तींपासून सुरक्षा करतो.” असे रोहित शेट्टी म्हणाले.“लिटल सिंघमच्या ह्या लाँचच्या निमित्ताने मुंबई पोलीस दलातील काही निवडक धैर्यशाली पोलीस अधिकारी आणि आणि त्यांची मुले तसेच आयसीसीडब्लू नॅशनल ब्रेव्हरी अॅवॉर्ड विजेत्यांची उपस्थिती लाभली याचा आम्हांला मनापासून आनंद आहे. त्यांच्या धैर्याचा आम्ही सन्मान करतो आणि आशा करतो की उज्ज्वल उद्यासाठी देशभरातील सर्व मुलांना समाजासाठी अधिकाधिक चांगले करण्याची प्रेरणा मिळेल.” नवीन अॅनिमेशन सीरीज ‘बंदबुध और बुडबक’च्या सुरूवातीनंतर फेब्रुवारी २०१८ पासून आपल्या रेटिंग्समध्ये डिस्कव्हरी किड्‌सने सुमारे २०० टक्के विकास साधलेला आहे.२१ एप्रिल रोजी लिटल सिंघमच्या सुरूवातीसह डिस्कव्हरी किड्‌सच्या रेटिंगमध्ये आणखी विकास होण्याची अपेक्षा असून ते देशात नवीन इतिहास रचतील.


Web Title: Motu Paltoo In The City Of Gold Motocyte With This Summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.