मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियोच्या सेटवर या कारणासाठी नीलू वाघेलाला दिला जातो मूव्ही ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 07:00 PM2019-04-21T19:00:00+5:302019-04-21T19:00:02+5:30
मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो या मालिकेत सत्या देवी आता कोर्टात सारिकाची केस लढणार आहे. या मालिकेत ही भूमिका नीलू वाघेला साकारत असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी तयारी देखील तशीच असावी लागते. अभिनेत्यांनी आपल्या भूमिकांची तयारी करण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण प्रकार केलेले आहेत. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो मालिकेचे कथानक एका रंजक वळणावर आले आहे. या मालिकेत आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. आता या मालिकेत कोर्टरूम ड्रामा सुरू होणार आहे. मालिकेत सत्या देवी आता कोर्टात सारिकाची केस लढणार आहे. या मालिकेत ही भूमिका नीलू वाघेला साकारत असून तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जया आणि समर यांच्यातल्या कडू-गोड नात्याच्या नोकझोकमध्ये आता सत्या देवी समरच्या बहिणीची केस लढायला तयार झाली आहे. ही भूमिका चांगल्याप्रकारे साकारता यावी यासाठी ती चित्रीकरणादरम्यान मेरी जंग, ऐतराज, दामिनी सारखे यांसारखे चित्रपट बघत असते. या सगळ्याच चित्रपटांमध्ये कोर्टातली दृश्ये खूपच चांगल्याप्रकारे चित्रीत करण्याल आली आहेत.
मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियोची संपूर्ण टीम हे चित्रपट पाहते आणि नीलूला तिच्या व्यक्तिरेखेसाठी उपयुक्त सूचना करत असते. नीलू देखील मालिकेतील हे महत्त्वाचे दृश्य उत्तमरित्या साकारण्यासाठी खूप बारकाईने चित्रपटातील दृश्ये पाहते आणि एक वकील कोर्टात कसे वर्तन करतो याचे निरीक्षण करत असते. इतकी तयारी केल्यानंतर, आपण नक्कीच ही आशा करू शकतो की, नीलू आपल्याला एका कुशल आणि दृढ वकिलाच्या भूमिकेत दिसेल.
याविषयी नीलूला विचारले असता तिने सांगितले, “एका सामर्थ्यवान वकिलाची भूमिका साकारण्याची उत्सुकता आणि त्याचबरोबर मनात थोडी चिंता असे दोन्ही मी अनुभवते आहे. वकिलाची भूमिका करणे हे कधीच सोपे नसते आणि मी माझ्या व्यक्तिरेखेत जीव ओतण्याचा पूर्ण प्रयत्न करते आहे. सर्व कलाकार आणि साहाय्यक मंडळी मला खूप मदत करत आहेत. तेही माझ्यासोबत कोर्टरूम चित्रपट बघून मला त्यांचे अभिप्राय देत आहेत आणि माझी भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी मदत करत आहेत. मी देहबोली, आवाजाचे चढउतार अशा सर्व बारीकसारीक गोष्टी माझ्या अभिनयात उतरवण्याचा प्रयत्न करते आहे.”