'मंगलम दंगलम'मध्ये रुमी करणार का मिसेस कुट्टीला इम्प्रेस?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 07:15 AM2019-01-04T07:15:00+5:302019-01-04T07:15:00+5:30
अर्जुन आणि रुमी हे दोघेही आपापल्या पालकांना त्यांचे नाते स्वीकारण्यासाठी मनवत असतानाच त्यांच्या प्रेमकथेला वेगळेच वळण लागते.
सोनी सब वाहिनीवरील 'मंगलम दंगलम' ही मालिका प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करत आहे. अर्जुन (करणवीर शर्मा) आणि रुमी (मनिषा रावत) हे दोघेही आपापल्या पालकांना त्यांचे नाते स्वीकारण्यासाठी मनवत असतानाच त्यांच्या प्रेमकथेला वेगळेच वळण लागते.
लावण्या जेव्हा सकलेचा यांच्या घरी येते, तेव्हा मिसेस कुट्टी यांना इम्प्रेस करण्यासाठी रुमीने आपले पाक कौशल्य आजमावून पायासम करावा, असा सल्ला ती देते. पायासमचा एक अख्खा बाऊल खाल्यानंतर कुट्टी यांना अॅलर्जी होते. यामुळे अर्जुन रुमीवर चिडतो. पायासममध्ये अक्रोड कुणी घातले हे रुमीला अद्यापही माहित नसते. तिला आपल्या वडिलांच्या खोलीत अक्रोडाचे साल मिळते आणि इतक्या खालच्या दर्जाची चाल खेळल्याबद्दल ती वडिलांवर नाराज होते. वडील काही हे मान्य करत नाहीत. त्यानंतर, संजीव (मनोज जोशी) यांना घरात कुणीतरी चलाखीने खेळ खेळत असल्याचा संशय येतो. संजीव स्वतःच या खेळाचे बळी ठरतात. मधल्या काळात, रुमीने लग्नानंतर कोणते नाव बदलावे, यासाठी सौ. कुट्टी नावांची यादी करतात.
याचा संजीव यांना राग येतो. आपल्या आईचा खरा डाव काय आहे, हे अर्जुनला समजेल का? नाव बदलण्याच्या प्रथेपासून रुमी स्वतःला वाचवू शकेल का?
मनिषा रावत म्हणाली, “मंगलम दंगलम या मालिकेत रुमी हे पात्र साकारताना मला फार मजा येते आहे. सेटवर आम्ही खूपच धमाल करतो. दररोज यात नवे वळण येत असून अर्जुन आणि रुमीच्या प्रेमकथेत नवीन उत्सुकता येते आहे. यात कितीही नाट्य असले, तरीही प्रेक्षकांना निखळ आनंद देत हसवण्याचे काम आमची मालिका करते आहे.’’
अनिता कुलकर्णी म्हणाल्या, “इतक्या गुणी कलाकारांसोबत मंगलम दंगलममध्ये काम करतानाचा अनुभव फारच रोमांचक आहे. पायासम घेतल्यानंतर सौ. कुट्टी यांना रिअॅक्शन येते आणि त्यांचा चेहरा सुजतो. हे नाट्य मालिकेतल्या आगामी भागात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. पायासममध्ये अक्रोड कुणी घातले हे अद्याप रुमीला माहित नाही. या गोंधळामुळे प्रेक्षकांमध्ये अधिकच हास्याचे धुमारे फुटणार आहेत.’’