'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमी पडली या अभिनेत्याच्या प्रेमात?, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 07:30 AM2021-05-12T07:30:00+5:302021-05-12T07:30:00+5:30
मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमीच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अमृता धोंगडे 'चांदणे शिंपित जाशी' मालिकेत चारुची भूमिका साकारते आहे.
झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेतील समर पाटील व खानावळीची मालकीण सुमी यांच्या प्रेमाने सगळ्यांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला होता. या मालिकेत सुमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता धोंगडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकतीच शेअर केलेल्या पोस्टमुळे ती अभिनेत्याच्या प्रेमात पडली असली असल्याची चर्चा सुरू आहे.
मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमीच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अमृता धोंगडे सोनी मराठीवरील चांदणे शिंपित जाशी मालिकेत चारुची भूमिका साकारत आहे. याच मालिकेतील अभिनेता अतुल आगलावे याच्यासोबत काही दिवसांपूर्वी अमृताने फोटो शेअर करून त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नाही तर फक्त शुभेच्छा न देता त्यासोबत तिने त्याचे भरभरून कौतुकही केलेले पाहायला मिळते आहे. यात तिने भली मोठी पोस्ट लिहून म्हटले की, आय लव्ह यू, बी अलवेज विथ मी. तिच्या या पोस्टनंतर त्या दोघांचे अफेयर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अमृता आणि अतुल दोघेही चांदणे शिंपित जाशी या मालिकेतून एकत्रित काम करत आहेत. यात अतुल राहुलची भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेच्या सेटवरच त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. अल्पावधीतच झालेली दोघांची मैत्री घनिष्ठ आहे हे त्यांच्या फोटोंवरूनच लक्षात येईल. ते दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसतात. हे दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत का? याबाबत सध्या सेटवर आणि चाहत्यांमध्येही चर्चा पाहायला मिळत आहे. ॉ
अभिनेता अतुल आगलावे मोलकरीणबाई मालिकेत झळकला होता. या मालिकेत त्याने साकारलेली रितीकची भूमिका खूपच हिट झाली होती. तू माझा सांगाती या मालिकेतून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. भाऊ कदम सोबत नशीबवान चित्रपटात त्याला अभिनयाची संधी मिळाली होती.
अमृताने मालिकेत काम करण्यापूर्वी ‘मिथुन’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्याआधी लहान मोठी कामं केली होती. परंतु खरी ओळख तिला ‘मिथुन’ या चित्रपटातून मिळाली.