​दस का दमसाठी मुदस्सर खानने सलमान खानला नाचवले तालावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 08:55 AM2018-05-18T08:55:45+5:302018-05-18T14:25:45+5:30

दमदार सलमान खान २०१८ मधील सर्वात जास्त प्रतिक्षित कार्यक्रम दस का दम घेऊन येत आहे. हा कार्यक्रम तब्बल 9 ...

Mudsar Khan danced Salman Khan to dance on Dabangg | ​दस का दमसाठी मुदस्सर खानने सलमान खानला नाचवले तालावर

​दस का दमसाठी मुदस्सर खानने सलमान खानला नाचवले तालावर

googlenewsNext
दार सलमान खान २०१८ मधील सर्वात जास्त प्रतिक्षित कार्यक्रम दस का दम घेऊन येत आहे. हा कार्यक्रम तब्बल 9 वर्षांनंतर पुन्हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे. मेगास्टार सलमानने या कार्यक्रमाच्या खास म्युझिक व्हिडिओसाठी नुकतेच चित्रीकरण केले. मिका सिंहने गायलेल्या मूळ गीताची ही रिव्हाइज्ड आवृत्ती आहे. या व्हिडिओचे नृत्यदिग्दर्शन मुदस्सर खानने केले आहे. मुदस्सरने सलमानच्या काही ब्लॉकबस्टर बॉलिवूड चित्रपटांतील गीतांची नृत्ये दिग्दर्शित केलेली आहेत. सलमानच्या ‘दस का दम’ या कार्यक्रमातील म्युझिक व्हिडिओमधील स्टेप्स या अतिशय सोप्या आणि चटकन अनुकरण करता येतील अशा असणार आहेत. या गीताचे नृत्यदिग्दर्शन सर्वांनाच आवडेल अशी मुदस्सरला खात्री आहे. या कार्यक्रमाच्या म्युझिक व्हिडिओच्या नृत्यदिग्दर्शनविषयी मुदस्सर सांगतो, “जेव्हा या म्युझिक व्हिडिओसाठी मला विचारण्यात आले, तेव्हा सलमानसोबत काम करण्याची ही संधी सोडायची नाही असे मी ठरवले. या कार्यक्रमातील हे गाणे खूप छान आहे आणि त्यावर सलमानने जे नृत्य केले आहे, ते तर अफतालून आहे. प्रेक्षकांना लवकरच दस का दमची मुख्य स्टेप बघायला मिळेल आणि मला खात्री आहे की, ती लोकप्रिय होईल. सलमानसोबत काम करायला खूप मजा येते. कारण त्याची ऊर्जा आणि कामावरील प्रेम पाहून समोरच्याला देखील प्रेरणा मिळते. या म्युझिक व्हिडिओचे एखाद्या मोठ्या बजेटच्या बॉलीवूड गीताप्रमाणे चित्रण करण्यात आले आहे आणि सर्व वयोगटातील लोकांना ते गीत आवडेल अशी मला आशा आहे. मी आतुरतेने हे गीत लाँच व्हायची वाट पाहत आहे.”
बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने बिग बॉसच्या अनेक सिझनचे आजवर सूत्रसंचालन केले आहे. बिग बॉसचा यंदाचा सिझन काहीच महिन्यांपूर्वी संपला असून या कार्यक्रमातील सलमानच्या सूत्रसंचालनाचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. सलमानने गेल्या काही वर्षांत मोठ्या पडद्याप्रमाणे छोट्या पडद्यावर देखील आपले एक स्थान निर्माण केले आहे. सलमानच्या चाहत्यांनी त्याला एक सूत्रसंलाचकाच्या भूमिकेत देखील स्वीकारले आहे. सलमान खानने दस का दम या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. या कार्यक्रमाचे काही सिझन झाल्यानंतर या कार्यक्रमाला सलमानने रामराम ठोकला. त्यानंतर तो बिग बॉस या कार्यक्रमात व्यग्र झाला. बिग बॉस हा कार्यक्रम गेल्या अनेक सिझनमध्ये टिआरपीच्या रेसमध्ये अव्वल आहे. सलमान खान बिग बॉस नंतर आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. दस का दम या कार्यक्रमाचा नवा सिझन देखील प्रेक्षकांना आवडेल अशी सगळ्यांना खात्री आहे. 

Also Read : ​या कारणामुळे सलमान खानचे फॅन्स झाले खूश, म्हटले सलमान खान सिंगलच बरा...

Web Title: Mudsar Khan danced Salman Khan to dance on Dabangg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.