मुग्धा-प्रथमेश एन्जॉय करत आहेत लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, मोदकही बनवले!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 12:11 PM2024-09-15T12:11:29+5:302024-09-15T12:12:10+5:30

मुग्धा-प्रथमेशने यंदा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव एकत्र कोकणात साजरा केला. 

Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghateh Enjoy First Ganeshotsav After Marriage In Konkan | मुग्धा-प्रथमेश एन्जॉय करत आहेत लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, मोदकही बनवले!

मुग्धा-प्रथमेश एन्जॉय करत आहेत लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, मोदकही बनवले!

मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan)  व प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) यांची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. त्यांच्या सुमधूर सुरांनी सर्वच प्रेक्षकांवर भुरळ पाडली.  मुग्धा-प्रथमेशचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या जोडप्याने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधत एका नव्या आयुष्याला सुरुवात केली. मुग्धा-प्रथमेशने यंदा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव एकत्र कोकणात साजरा केला. 

यंदाच्या गणेशोत्सवात मुग्धा आणि प्रथमेश दोघेही गावाकडे रमले आहेत. मुग्धाने तिच्या गणेशोत्सवाची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. मुग्धाने कोकणात गणपती बाप्पांची मूर्ती घडवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर जेव्हा घरात स्थापना झाली, त्याचाही फोटो शेअर केला होता. कोकणातल्या मातीत मुग्धा चांगली रमल्याचं तिच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. हे फोटो पाहून नेटकरी मुग्धा आणि प्रथमेशच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत. 


मुग्धाने गणपती बाप्पांसाठी मोदक करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुग्धा ही बाप्पासाठी खास उकडीचे मोदक करताना दिसत आहेत. तिच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी "अरे वाह जितकी मन लावून गोड गातेस तसेच मोदक पण झालेत छान", "वा वा सर्व गुणसंपन्न सून आहे हो लघाट्यानची खूप छान मुग्धा", अशा कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. 


 मुग्धा आणि प्रथमेश दोघंही कोकणातलेच. मुग्धा अलिबागची तर प्रथमेश रत्नागिरीचा. कोकणचं सौंदर्य ते कायम त्यांच्या व्हिडीओमधून दाखवत असतात.  दोघंही उत्तम गायक तर आहेतच पण खूप सरळ आहेत. कुठलाही बडेजाव न दाखवता आपलं साधं, सुंदर आयुष्य चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यांचा हा स्वभाव चाहत्यांच्याही खूप पसंतीस पडतो. युट्यूब व्लॉग वरुन ते कोकणचं वैभव दाखवतात. त्यांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात.  
 

Web Title: Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghateh Enjoy First Ganeshotsav After Marriage In Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.