Mukesh Khanna : “और भी ग़म है ज़माने में ‘सास बहू’ के सिवाय ...”, मुकेश खन्नांनी एकता कपूरवर काढली भडास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 16:25 IST2022-09-25T16:22:54+5:302022-09-25T16:25:09+5:30
Mukesh Khanna : सासू-सुनांच्या मालिकांनी टीव्हीचा सत्यानाश...'; एकता कपूरवर भडकले मुकेश खन्ना

Mukesh Khanna : “और भी ग़म है ज़माने में ‘सास बहू’ के सिवाय ...”, मुकेश खन्नांनी एकता कपूरवर काढली भडास
एकेकाळी शक्तिमान, रामायण, महाभारत यासारख्या मालिकांनी छोटा पडदा गाजवला. पण काळासोबत या मालिकांची जागा ‘सास बहू’ ड्रामांनी घेतली. सास-बहू सीरिअल्सच्या काळात शक्तिमान, रामायण, महाभारत अशा मालिका जणू छोट्या पडद्यावरून गायब झाल्यात. आता अभिनेते मुकेश खन्ना ( Mukesh Khanna) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि ही प्रतिक्रिया देताना त्यांनी एकता कपूरवर (Ekta Kapoor) सगळी भडास काढली आहे.
काय म्हणाले मुकेश खन्ना?
सॅटेलाइट टीव्हीचा सॅच्युरेशन पॉइंट आला आहे. आता सगळेच एकमेकांची कॉपी करत आहेत. टिकल्या, कानातले, साड्या, लहंगे, सासू सूना, नणंद-भावजया सगळीकडे याचेच साम्राज्य आहे. मी काही वर्षांपूर्वी बोललो होतो. सास भी कभी बहू थी या मालिकेने टीव्हीचा सत्यानाश केला. अलीकडे एका सुप्रसिद्ध कलाकारानेही हेच म्हटलं. हे दुर्दैवी आहे. पण खरं आहे. माझ्या मते, टीव्हीवरच्या निर्मात्या-दिग्दर्शकांना नवा विचार करण्याची गरज आहे, असं मुकेश खन्ना म्हणाले.
एकताने सत्यानाश केला...
आपल्या युट्यूब ब्लॉगमध्ये मुकेश खन्ना यांनी एकता कपूरवर निशाणा साधला. एकता कपूर तू सास-बहू मालिका बनवून टीव्हीचा सत्यानाश केला. सास भी कभी बहू थी या मालिकेने टीव्हीचं सुवर्ण युग संपुष्टात आणलं. रामायण, महाभारत, चंद्रकांता, हेरगिरीवरचे शेज टीव्हीने संपवले आणि याला कारण ठरलं सास बहू अँगल. गेल्या 20 वर्षांपासून याच मालिका टीव्हीवर राज्य करत आहे. या मालिकांनी दूरदर्शनला संपवलं. तुम्ही काय मॅसेज देत आहात? तुम्ही काय दाखवत आहात? एका एका मालिकांमध्ये चार-पाच बायका भरजरी साड्या घालून खलनायिका म्हणून वावरतात. आता तरी देशातल्या महिलांना निगेटीव्ह दाखवणं बंद करा. बरेच चांगले विषय आहेत, ते दाखवा, असं मुकेश खन्ना म्हणाले.