सलमान, शाहरुख नाही 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना 'हा' साउथ सुपरस्टार वाटतो परफेक्ट; म्हणाले- "त्याच्यात ती पात्रता..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:04 IST2024-12-13T15:58:53+5:302024-12-13T16:04:31+5:30

देशभरात सध्या 'पुष्पा-२' चित्रपट गाजत आहे.

mukesh khanna review about pushpa 2 movie says about allu arjun could play shaktimaan | सलमान, शाहरुख नाही 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना 'हा' साउथ सुपरस्टार वाटतो परफेक्ट; म्हणाले- "त्याच्यात ती पात्रता..."

सलमान, शाहरुख नाही 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना 'हा' साउथ सुपरस्टार वाटतो परफेक्ट; म्हणाले- "त्याच्यात ती पात्रता..."

Mukesh Khanna On Allu Arjun:अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा-२:द रुल' हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित झाला. देशभरात सध्या 'पुष्पा-२' चित्रपट गाजत आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर  धुमाकूळ घालतो आहे. हा सिनेमा जागतिक स्तरावर कमाईचे नवीन विक्रम रचत आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबद्दल आता मनोरंजनविश्वातील कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यातच 'शक्तिमान' फेम अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी 'पुष्पा-२'बद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. 

अलिकडेच मुकेश खन्ना यांनी त्यांच्या 'भीष्म इंटरनॅशनल' या युट्यूब चॅनेलवरून त्यांची प्रतिक्रिया दिली. त्यादरम्यान ते म्हणाले की, "कोणताही सिनेमा हा पैशांनी बनत नाही तर त्यासाठी योग्य नियोजन असणं गरजेचं असतं. त्यामुळे 'पुष्पा-२' साठी खर्च केलेला पैसा हा स्क्रीनवर दिसतो आहे." त्याचबरोबर चित्रपटाच्या सुरुवातीचे सीन्स पाहून त्यांनी दिग्दर्शक सुकुमार यांचं तोंडभरुन कौतुक केलं. 

पुढे मुकेश खन्ना म्हणाले, "असं आहे की जर तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्याकडून स्विकारंल जातं." त्यासोबतच मुकेश खन्ना यांनी 'पुष्पा-२' मधील अल्लू अर्जुनचा परफॉर्मन्स पाहून त्याला ८-९ असे गुण दिले आहेत. अल्लू अर्जुनचं कौतुक करत मुकेश खन्ना यांनी सांगितलं की, "मला वाटतं अल्लू अर्जुन आणखी बरेच चित्रपट पाहावे लागतील. शिवाय मला हे सुद्धा सांगावसं वाटतं की शक्तिमानची भूमिका तो उत्तरित्या निभावू शकतो. ते पात्र साकारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. " असं मला वाटतं. 

Web Title: mukesh khanna review about pushpa 2 movie says about allu arjun could play shaktimaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.