मुकेश खन्ना यांनी का केले नाही लग्न? स्वत: दिले उत्तर
By रूपाली मुधोळकर | Published: October 13, 2020 08:00 AM2020-10-13T08:00:00+5:302020-10-13T08:00:01+5:30
विवाहसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण...
शक्तिमान आणि भीष्म पितामह यासारख्या भूमिका साकारणारे मुकेश खन्ना अविवाहित आहेत. एकेकाळी मुकेश खन्ना लग्नामुळे सतत चर्चेत असत. कालांतराने या चर्चा थांबल्या. पण मुकेश खन्ना यांनी लग्न का केले नाही? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहिला. आता मात्र खुद्द मुकेश खन्ना यांनीच या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
ऑन द टॉक्स या युट्यूब चॅनलवरच्या एका व्हिडीओत मुकेश खन्ना या प्रश्नाचे उत्तर देताना दिसतात.
ते म्हणतात, ‘एकेकाळी मी लग्न कधी करणार? हा प्रश्न विचारून लोकांनी मला भंडावून सोडले होते. त्यावेळी प्रत्येक पत्रकाराचाही हाच आवडता प्रश्न होता. माझी मुलाखत घ्यायला आलेला प्रत्येक पत्रकार सरतेशेवटी तुम्ही लग्न कधी करत आहात? हाच प्रश्न विचारायचा. काही लोकांच्या मते, मी महाभारतात भीष्म पितामहची भूमिका साकारल्याने लग्न केलेले नाही. पण हे खरे नाही. भीष्म पितामह माझ्यासाठी निश्चितपणे आदर्श आहेत. पण ख-या आयुष्यात मी भीष्म पितामह बनू शकेल, इतका मी महान नाही. कोणीच भीष्म पितामह बनू शकत नाही. खरे तर मी लग्नच करणार नाही, अशी कोणतीही भीष्मप्रतिज्ञा मी घेतलेली नाही. ’
पुढे ते सांगतात, ‘विवाहसंस्थेला माझा अजिबात विरोध नाही. विवाहसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण हो, लग्न हे नशीबात हवे, हे मात्र खरे. लग्न असेच होत नाही. लग्न याचा अर्थ दोन आत्म्यांचे मिलन. लग्नाच्या गाठी स्वर्गातच पडतात, असे म्हणतात ते खरे आहे. दोन लोक भेटतात, लग्नबंधनात अडकतात, हे त्यांचे नशीब. ते वरूनच लिहून येते.’
मुकेश खन्ना यांनी 80 च्या दशकात अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. ‘महाभारत’ या मालिकेने त्यांना एक नवी ओळख दिली. 1997 मध्ये मुकेश खन्ना यांनी स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसखाली ‘शक्तिमान’ ही मालिका बनवली. या मालिकेनेही इतिहास रचला. सौगंध, सौदागर, बेताज बादशाह, ताकत, हेराफेरी, बारूद या सिनेमात त्यांनी काम केले आहे.
माझा लग्नाची कॉन्ट्रोव्हर्सी संपवू या...
तसा मी अनेक कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलो आहे. माझ्या परखड स्वभावामुळे मी अनेकदा वादात सापडलो आहे. लग्न कदाचित ही सुद्धा माझ्या आयुष्यातील एक अशीच कॉन्ट्रोव्हर्सी आहे, जी मला संपवायची आहे. आता तर माझ्यासाठी कोणती मुलगी जन्म घेणार नाही, तेव्हा ही कॉन्ट्रोव्हर्सी इथेच संपवू या,असेही ते म्हणाले.
इंडस्ट्रीत तुझी इज्जत काय...? मुकेश खन्ना यांचा पुन्हा गजेंद्र चौहान यांच्यावर निशाणा
ते ‘महाभारत’ विसरलेत का? ‘कपिल शर्मा शो’वरून मुकेश खन्ना-गजेंद्र चौहान यांच्यात जुंपली
यापेक्षा दुसरा वाह्यात शो नाही...! मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’वर बरसले