अखेर 'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा, कॅनडामध्ये डॉक्टर अन् मॉडेलही, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 10:56 IST2025-01-03T10:56:00+5:302025-01-03T10:56:26+5:30
इंडिया टू कॅनडा.. अखेर सिद्धार्थ खिरीडने दाखवलाच होणाऱ्या बायकोचा चेहरा. काय करते ती? (siddharth khirid)

अखेर 'मुलगी झाली हो' फेम अभिनेत्याने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा, कॅनडामध्ये डॉक्टर अन् मॉडेलही, कोण आहे ती?
अभिनेता सिद्धार्थ खिरीड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सिद्धार्थला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. सिद्धार्थची 'फ्रेशर्स' ही मालिका प्रचंड गाजली. सिद्धार्थ एक चांगला अभिनेता आणि उत्कृष्ट डान्सर आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. सिद्धार्थने काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर त्याच्या होणाऱ्या बायकोची झलक सोशल मीडियावर शेअर केली. सिद्धार्थने तिचा चेहरा दाखवला नव्हता. अखेर काल (२ जानेवारीला) सिद्धार्थने त्याच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा दाखवला. कोण आहे ती?
सिद्धार्थची होणारी बायको आहे तरी कोण?
सिद्धार्थ खिरीडने गोव्यात खास पद्धतीने होणाऱ्या बायकोला प्रपोज केलं. त्याचे फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले. सिद्धार्थच्या होणाऱ्या बायकोचं नाव मैथिली भोसेकर असं असून ती एक डॉक्टर आणि मॉडेलही आहे. काही महिन्यांपूर्वा झालेल्या पॅरिस फॅशन वीकमध्ये मैथिली चमकली होती. मैथिली मूळची डोंबीवलीची असून ती कॅनडामध्ये राहते. Love Knows No Border असं कॅप्शन देत सिद्धार्थने मैथिलीसोबतचे फोटो शेअर केलेत.
सिद्धार्थने खास पद्धतीने केलं प्रपोज
सिद्धार्थने सोशल मीडियावर फोटो शेअर करुन मैथिलीला खास पद्धतीने प्रपोज केलेलं दिसतं. गोव्यात हार्ट शेपची सजावट करुन त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करत सिद्धार्थने मैथिलीला लग्नाची मागणी घातली. दोन देश, दोन हृदय, दोन प्रोफेशन अन् एक प्रेम कहाणी असं कॅप्शन देत सिद्धार्थने हे फोटो शेअर केलेत. सिद्धार्थ अन् मैथिलीचा फोटो समोर येताच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी दोघांचं अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.