रडता-रडता बेशुद्ध पडली मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयशा, बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 06:14 PM2023-12-31T18:14:10+5:302023-12-31T18:15:47+5:30

यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

Munavvar's ex-girlfriend Ayesha fell unconscious crying in the Bigg Boss house | रडता-रडता बेशुद्ध पडली मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयशा, बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?

रडता-रडता बेशुद्ध पडली मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड आयशा, बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?

'बिग बॉस १७' पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त असला तरीदेखील हा शो तितकाच लोकप्रियही आहे. यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मुनव्वर फारुकीची  एक्स गर्लफ्रेंड आयशा खानने घरात एन्ट्री घेतल्यापासून दोघेही चर्चेत आहेत. 

बिग बॉसच्या 'विकेंड का वॉर' एपिसोडमध्ये सलमान खानने आएशा खानला फटकारले. आएशाला मुनव्वरबाबत प्रश्न विचारल्याने ती रडायला लागली. यातच रडता-रडता आएशा चक्कर येऊन खाली पडली. त्यानंतर तातडीने आएशाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रोमोमध्ये दिसून आले की, आयशा खान रूममधून रडतच बाहेर पडते आणि तेवढ्यात ती बेशुद्ध पडल्याचे दिसते. आएशचाही अवस्था पाहून घरात एकच गोंधळ उडतो. यानंतर सलमान खाने स्वतः घरात येऊन कुटुंबातील सदस्यांना शांत केले.

याशिवाय 'बिग बॉस 17'चे अपडेट्स देणाऱ्या एका पेजने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आयेशा खान बेशुद्ध झाली नसून तिने स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित फुटेज संपादित केले गेले आहे. ज्या प्रकारे घरातील सदस्यांचे हावभाव होते. त्यावरुन ती बेशुद्ध झाल्याचे वाटत नाही. 

 खरं तर, याआधी आठवड्यात दोनदा ती बेशुद्ध पडली होती आणि जमिनीवर पडल्याचे दाखवण्यात आले होते. पण यावेळी ते दाखवण्यात आले नाही. यावेळी फुटेजमध्ये आयेशाचा चेहराही दाखवण्यात आला नाही.  प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी हा ड्रामा होता की खरेच ती बेशुद्ध झाली होती, असा सवाल केला आहे.  एका यूजरने म्हटले की, 'जर स्वतःचे नुकसान केले असेल तर तिने तो शो सोडावा'. तर  सत्य काय आहे ते येत्या एपिसोडमध्ये कळेलच.

Web Title: Munavvar's ex-girlfriend Ayesha fell unconscious crying in the Bigg Boss house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.