Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 02:22 PM2024-09-24T14:22:50+5:302024-09-24T14:24:08+5:30
मुनव्वर फारुकीने खरेदी केलेल्या फ्लॅटची किंमत तब्बल...
स्टँडअप कॉमेडियन आणि बिग बॉस 17 चा विजेता मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) मुंबईत नवं आलिशान अपार्टमेंट घेतलं आहे. एकीकडे तो एकानंतर एक वादात अडकताना दिसतो तर दुसरीकडे त्याची प्रगतीही होत आहे. बिग बॉस १७ जिंकल्यानंतर तर तो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. मुंबईतील वडाळा येथे न्यू कफ परेड भागात त्याने नवीन फ्लॅट खरेदी केला आहे.
स्क्वायर यार्ड्स रिपोर्टनुसार, मुनव्वर फारुकीने खरेदी केलेल्या फ्लॅटची किंमत तब्बल ६.०९ कोटी रुपये आहे. हा फ्लॅट हाय राइज अपार्टमेंटमध्ये आहे ज्याचं सध्या कन्स्ट्रक्शन सुरु आहे. १७६७.९७ चौरस फुट फ्लॅटचा एरिया आहे. यामध्ये तीन पार्किंग स्पेसही उपलब्ध आहेत. मुनव्वरने १६ सप्टेंबर रोजी फ्लॅटचं रजिस्ट्रेशन केलं. यासाठी त्याने ३० हजार रुपये रजिस्ट्रेशन फी आणि ३६.६ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे. या अपार्टमेंटमधीर सर्व फ्लॅट्स हे ३ बीएके आणि ४ बीएचके आहेत. सर्व सोयी सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत.
रिपोर्टनुसार, मुनव्वर फारुकीची नेट वर्थ ८ कोटी रुपये आहे. स्टॅण्डअप कॉमेडी, रिएलिटी शोज, म्युझिक व्हिडिओज, युट्यूब व्हिडिओ मधून मुनव्वरची बक्कळ कमाई होते. बिग बॉस जिंकल्यानंतर त्यालवा ५० लाख मिळाले होते. तसंच प्रत्येक एपिसोडसाठी त्याला ७-८ लाख रुपये मिळाले होते. यात जर कॅश प्राईस जोडली तर त्याने पूर्ण सीझनमध्ये तब्बल १.७ कोटी रुपये कमावले. तसंच मुनव्वर एका स्टेज परफॉर्मन्ससाठी २ ते अडीच लाख रुपये चार्ज करतो. तर इन्स्टाग्रामवर स्पॉन्सर्ड पोस्टसाठी १५ लाख रुपये घेतो.
काही दिवसांपूर्वीच मुनव्वर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. मेकअप आर्टिस्ट मेहजबीनसोबत त्याने प्रेमविवाह केला. त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगाही आहे.