मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या पत्नीलाही आहे एक मुलगी, मेहजबीनने दोन्ही मुलांसोबत शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 03:21 PM2024-07-10T15:21:24+5:302024-07-10T15:21:59+5:30

मेहजबीनने  नुकताच एक फोटो शेअर केला. यामध्ये तिची लेक आणि मुनव्वरचा मुलगाही आहे.

Munawar Faruqui s step daughter photo revealed wife Mehzabeen Kotwala shared post | मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या पत्नीलाही आहे एक मुलगी, मेहजबीनने दोन्ही मुलांसोबत शेअर केला फोटो

मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या पत्नीलाही आहे एक मुलगी, मेहजबीनने दोन्ही मुलांसोबत शेअर केला फोटो

Bigg Boss 17 चा विजेता मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) काही दिवसांपूर्वीच दुसरं लग्न केलं. मेकअप आर्टिस्ट मेहजबीन कोटवालासोबत त्याने निकाह केला. केक कट करत सेलिब्रेशन करतानाचे फोटोही त्याने पोस्ट केले होते. महजबीनचं सुद्धा हे दुसरं लग्न आहे. शिवाय पहिल्या पतीपासून तिला एक मुलगीही आहे. नुकतीच एका फोटोत तिची झलक दिसली.

मुनव्वर आणि मेहजबीन यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला. मेहजबीनने  नुकताच एक फोटो शेअर केला. यामध्ये तिची लेक आणि मुनव्वरचा मुलगाही आहे. मुनव्वरच्या मुलासोबतही तिचा चांगला बाँड असल्याचं यातून पाहायला मिळत आहे. तसंच तिच्या लेकीचीही झलक या फोटोत दिसत आहे. मेहजबीनची लेकही खूपच गोड दिसते. 'लाईफलाईन' असं कॅप्शन तिने दिलं आहे. 

मुनव्वरच्या दुसऱ्या लग्नामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्याची दुसरी पत्नी आहे तरी कोण? असा प्रश्न पडला होता. बिग बॉसमध्ये सहभागी होण्याच्या  आधीपासूनच त्याचे अनेक अफेअर चर्चेत होते. त्याची एक्स गर्लफ्रेंड आएशा खानही बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. तर मुनव्वर आणि मन्नारा चोप्राचं नाव जोडलं जात होतं. मात्र अचानक मुनव्वरने मेकअप आर्टिस्ट मेहजबीनशी लग्न केल्याचा खुलासा केला आणि सर्वांना आश्चर्यचकित केलं.  मेहजबीन  जास्त वेळ कामामुळे दुबईतच असते. मुनव्वरला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे ज्याला त्यानेच सांभाळलं आहे.

Web Title: Munawar Faruqui s step daughter photo revealed wife Mehzabeen Kotwala shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.