'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 09:30 AM2024-05-30T09:30:16+5:302024-05-30T09:31:01+5:30

मुनव्वरची दुसरी पत्नीही आहे घटस्फोटित, नक्की करते काय?

Munawar Farurqui s second wife Mehzabeen Coatwala couple photo viral | 'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?

'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीचा दुसऱ्या पत्नीसोबत फोटो व्हायरल, कोण आहे ही सुंदरी?

'बिग बॉस 17'चा विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) दुसरं लग्न केल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच आली होती. आता त्याचा दुसऱ्या बायकोसोबतचा फोटोही व्हायरल झाला आहे. त्यामुळे मुनव्वरने दुसरा निकाह केल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय. महजबीन कोटवाला (Mehzabeen Coatwala) असं त्याच्या दुसऱ्या पत्नीचं नाव आहे.

मुनव्वर आणि महजबीन यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये दोघंही केक कट करताना दिसत आहेत. व्हाईट शर्ट आणि बेज पँट अशा लूकमध्ये मुनव्वर दिसत आहे. तर महजबीनने जांभळ्या रंगाचा शरारा सूट परिधान केला आहे. नेकलेस, मोकळे केस आणि थोडा मेकअप अशा लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. त्यांच्या रिसेप्शन पार्टीतील हा फोटो असल्याचा अंदाज आहे.  26 मे ला आयटीसी ग्रँड मराठामध्ये रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती. या रिसेप्शन पार्टीत हिना खानही सहभागी झाली होती.

मुनव्वर फारुकीचं हे दुसरं लग्न आहे. 2022 मध्येच त्याचा पहिली पत्नी जास्मिनसोबत घटस्फोट झाला. त्यांना मिकाइल हा मुलगाही आहे. आज मिकाइलचा वाढदिवस असून मुनव्वरने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवली आहे.

महजबीन कोटवाला ही मेकअप आर्टिस्ट आहे. तिचंही हे दुसरं लग्न आहे. पहिल्या पतीपासून तिला १० वर्षांची समायरा ही मुलगी आहे. मुनव्वर आणि महजबीनने अद्याप त्यांचा निकाह ऑफिशियल केलेला नाही. मात्र त्यांचा हा फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Web Title: Munawar Farurqui s second wife Mehzabeen Coatwala couple photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.