मुनिषा 'बिग बॉस'मधून बाहेर, तर विशालला कानाखाली मारल्यामुळे अरमानला सुनावली ही शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 09:54 AM2024-07-08T09:54:39+5:302024-07-08T09:55:54+5:30

बिग बॉसमध्ये काल मुनिषाला घराबाहेर जावं लागलं असून अरमानला ही खास शिक्षा सुनावली आहे (bigg boss ott 3)

Munisha khatwani was shown the way out by BB ott 3 and Armaan malik was punished for hitting Vishal | मुनिषा 'बिग बॉस'मधून बाहेर, तर विशालला कानाखाली मारल्यामुळे अरमानला सुनावली ही शिक्षा

मुनिषा 'बिग बॉस'मधून बाहेर, तर विशालला कानाखाली मारल्यामुळे अरमानला सुनावली ही शिक्षा

Bigg Boss OTT 3 ची चर्चा सध्या शिगेला आहे. अनिल कपूर यंदाच्या सीझनचं होस्टिंग करत आहे. Bigg Boss OTT 3  मध्ये काल रविवारी एका स्पर्धकाला घराबाहेरचा रस्ता धरावा लागला आहे. ही स्पर्धक म्हणजे मुनिषा खतवानी.  Bigg Boss OTT 3 मध्ये घराबाहेर जाण्यासाठी सना सुलतान आणि मुनिषा खतवानी या दोघी घराबाहेर जाण्यासाठी चर्चेत होत्या. पण या दोघींपैकी मुनिषाला घराबाहेर जावं लागलं आहे.

मुनिषा खेतवानी घराबाहेर

या आठवड्यात सना सुलतान आणि मुनिषा खतवानी या दोघी घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट होत्या. त्यापैकी घरातील सदस्यांनी सना सुलतानचे नाव घेत ती चांगली खेळाडू असल्याचे सांगितले. तर लवकेश, विशाल आणि सना मकबूल यांनी मुनिषाला सपोर्ट केला. घरातील ८ जणांनी सनाला वोट केलं तर मुनिषाला फक्त तीन मतं मिळाली. त्यामुळे कमी मतं मिळाल्याने मुनिषाला घराबाहेर जावं लागलं.

अरमानला बिग बॉसने सुनावली शिक्षा

'बिग बॉस ओटीटी सीझन 3'च्या नवीन एपिसोडमध्ये आपण पाहिले की, अरमानची पहिली पत्नी पायल मलिक वीकेंड का वार मध्ये येते आणि ती विशाल पांडेविषयीचा गौप्यस्फोट करते. विशालला अरमानची दुसरी पत्नी कृतिका आवडते, असा खुलासा ती करते. त्यानंतर रागाच्या भरात अरमानने विशालला कानाखाली मारली. त्यामुळे अरमान मलिकला घरातून हाकलून द्यावे, असं लवकेश आणि दीपक चौरसिया म्हणाले. पुढे बिग बॉसने शिक्षा देताना अरमान मलिकला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केले. त्यामुळे पुढील प्रत्येक आठवड्यात अरमानला नॉमिनेट व्हावं लागणार आहे.

Web Title: Munisha khatwani was shown the way out by BB ott 3 and Armaan malik was punished for hitting Vishal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.