जेठालालमुळेच झाली बबिताची 'तारक मेहता...' मध्ये एन्ट्री? मुनमुन दत्तानेच सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 03:38 PM2024-09-28T15:38:51+5:302024-09-28T15:40:10+5:30

अभिनेत्री मुनमुन दत्ता आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Munmun Dutta shared how she got selected for Babita s role in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | जेठालालमुळेच झाली बबिताची 'तारक मेहता...' मध्ये एन्ट्री? मुनमुन दत्तानेच सांगितला किस्सा

जेठालालमुळेच झाली बबिताची 'तारक मेहता...' मध्ये एन्ट्री? मुनमुन दत्तानेच सांगितला किस्सा

२००८ पासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही सीरिज प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. तसंच ही मालिका हसवता हसवता नेहमीच काही ना काही संदेशही देते. मालिकेतील प्रत्येक पात्र गाजलं आहे. जेठालाल, दया, बबिता, अय्यर, तारक, अंजली, हाथी, सोढी आणि बाकी बरेच. आज काही कलाकारांनी मालिका सोडली असली तरी त्यांची क्रेझ कमी झालेली नाही. दरम्यान मालिकेतील जेठालाल-बबिता यांचा अँगल सर्वच एन्जॉय करतात. तुम्हाला माहितीये का बबिताची भूमिका साकारण्याऱ्या मुनमुन दत्ताची मालिकेत एन्ट्री कशी झाली?

अभिनेत्री मुनमुन दत्ता आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. पश्चिम बंगालमध्येच बंगाली कुटुंबात मूनमून दत्ताचा जन्म झाला. तिने कोलकता येथे इंग्लीश लिट्रेचरमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. मात्र बबिता लहानपणापासूनच गायन आणि नृत्यात पारंगत होती. ती दूरदर्शन आणि आकाशवाणीवर कार्यक्रमही करायची. त्यामुळे कला तिच्या अंगात आधीपासूनच होती. २००४ मध्ये तिला 'हम सब बाराती' या मालिकेत अभिनय करण्याची संधी मिळाली.  टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मुनमुन म्हणाली, होती की, "२००८ साली तारक मेहता मालिका सुरु झाली. तेव्हा मालिकेतील जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांनीच मला बबिताच्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यास सुचवलं. एवढे सीनिअर अभिनेते हे सांगत आहेत म्हणल्यावर मीही ऑडिशन दिली आणि अशा प्रकारे माझी निवड झाली.


तारक मेहता मालिकेच्या आधी मुनमुनने २००६ साली कमल हसन यांच्या 'मुंबई एक्सप्रेस' मधून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. तसंच ती अक्षय कुमारच्या 'हॉलिडे' सिनेमातही दिसली. मुनमुन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रामवर ८० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिला बबिता नावानेच ओळख मिळाली आहे. 

Web Title: Munmun Dutta shared how she got selected for Babita s role in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.