'मुरांबा' फेम शशांक केतकरने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क, म्हणाला - "लोकशाहीच्या बळकटीसाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 17:19 IST2024-05-07T17:17:40+5:302024-05-07T17:19:28+5:30
Shashank Ketkar : अभिनेता शशांक केतकर याने पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली आहे.

'मुरांबा' फेम शशांक केतकरने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क, म्हणाला - "लोकशाहीच्या बळकटीसाठी..."
लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यातील ११ मतदारसंघात मतदान होत आहे. दरम्यान आज अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याने पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली आहे.
शशांक केतकरने सोशल मीडियावर पत्नी प्रियंका केतकरसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोतून समजते आहे की, त्या दोघांनी मतदान केले आहे. त्यांनी मतदान केंद्राबाहेर येऊन बोटावरील शाही दाखवून मतदानाचे कर्तव्य बजावल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. हा फोटो शेअर करत शशांकने लिहिले की, आपली लोकशाही बळकट करण्यात आपले थोडेसे योगदान दिले आहे. कृपया मतदान करा.
वर्कफ्रंट
शशांक केतकरने मालिकेव्यतिरिक्त चित्रपट आणि नाटकातही काम केले आहे. नुकताच तो इमरान हाश्मीच्या शो टाइम या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकला. . याआधी तो 'स्कॅम २००३' या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. सध्या शशांक 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.