लोकप्रिय अभिनेत्रीची 'मुरांबा'मधून एक्झिट; 'काव्यांजली' फेम अभिनेत्रीला केलं रिप्लेस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 09:15 AM2024-06-10T09:15:23+5:302024-06-10T09:17:08+5:30

Muramba: एका खास कारणामुळे या अभिनेत्रीने ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर आता ती एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

muramba-fame-smita-shewale-left-the-star-pravah-serial-replaced-by-actress-meera-sarang | लोकप्रिय अभिनेत्रीची 'मुरांबा'मधून एक्झिट; 'काव्यांजली' फेम अभिनेत्रीला केलं रिप्लेस

लोकप्रिय अभिनेत्रीची 'मुरांबा'मधून एक्झिट; 'काव्यांजली' फेम अभिनेत्रीला केलं रिप्लेस

छोट्या पडद्यावर अपार लोकप्रियता मिळालेली मालिका म्हणजे 'मुरांबा'. शिवानी मुंढेकर आणि शशांक केतकर यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका सुरु झाल्यापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे या मालिकेत येणारे टर्न आणि ट्विस्ट प्रेक्षक आवडीने पाहतात. या मालिकेत आतापर्यंत अनेक कलाकारांची एन्ट्री झाली. तर काही लोकप्रिय कलाकारांना मालिकेतून काढता पाय घेतला.  यामध्येच आता मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे.

सध्या या मालिकेत सुलेखा तळवलकर, अभिजीत चव्हाण, स्मिता शेवाळे, प्रतिमा कुलकर्णी, निशानी बोरुळे, शशांक केतकर, आशिष जोशी आणि शिवानी मुंढेकर हे कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. परंतु, यांच्यापैकी एका लोकप्रिय अभिनेत्रीने मालिकेतून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आता या मालिकेत तिच्याऐवजी एक नवीन अभिनेत्री दिसणार आहे.

अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने मुरांबा मालिका सोडली आहे. या मालिकेत तिने जाह्नवी मुकादम ही भूमिका साकारली होती. जाह्नवी कायम रमा आणि अक्षयला साथ द्यायची त्यामुळे तिची भूमिका विशेष लोकप्रिय झाली होती. परंतु, आता तिने या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. तिच्या जागी आता या मालिकेत एक नवीन अभिनेत्री झळकणार आहे.

दरम्यान, स्मिताने 'बिग बॉस मराठी 5' साठी ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे. आता या मालिकेत स्मिताऐवजी 'काव्यांजली' फेम अभिनेत्री मीरा सारंग ही जाह्नवीची भूमिका साकारणार आहे. स्मितापूर्वी 'मुरांबा'मधून अभिनेत्री काजल काटे हिने काढता पाय घेतला होता.

Web Title: muramba-fame-smita-shewale-left-the-star-pravah-serial-replaced-by-actress-meera-sarang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.