'देव येऊन स्वच्छ करतील आपण फक्त...'; नदीच्या प्रदुषणावर शशांक केतकरची मार्मिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:06 PM2024-08-31T12:06:35+5:302024-08-31T12:07:14+5:30

शशांक केतकर सोशल मीडियावर विविध सामाजिक, राजकीय घटनांवर भाष्य करत असतो. शशांकने नुकतीच केलेली पोस्ट चर्चेत आहे (shashank ketkar)

muramba serial fame marathi actor shashank ketkar on river cleanliness in india ganga river | 'देव येऊन स्वच्छ करतील आपण फक्त...'; नदीच्या प्रदुषणावर शशांक केतकरची मार्मिक पोस्ट

'देव येऊन स्वच्छ करतील आपण फक्त...'; नदीच्या प्रदुषणावर शशांक केतकरची मार्मिक पोस्ट

शशांक केतकर हा मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतला अभिनेता. शशांकने केवळ मराठीच नाही तर हिंदी वेबसीरिजमध्येही स्वतःचं नाव कमावलंय. 'स्कॅम २००३' तेलगी स्टोरी वेबसीरिजमध्ये शशांक झळकला होता. शशांक विविध राजकीय सामाजिक विषयांवर पोस्ट शेअर करत असतो. शशांक थोडक्यात पण मार्मिक पोस्ट करुन अनेकदा लोकांच्या डोळ्यात अंजन घालतो. शशांकची नवी पोस्ट देखील चर्चेत आहे.

शशांक केतकरने नदी प्रदुषणावर केलं भाष्य

भारतात अनेक ठिकाणी नदीचं प्रदुषण होताना दिसतं. निर्माल्य, हार-तुरे, खायच्या पदार्थांचे पाकीट्स अशा अनेक गोष्टी लोक सर्रास नदीवर टाकताना दिसतात. याच गोष्टीवर शशांकने मौन सोडलंय. आपल्या देशात गंगा नदीला माता मानतात. परंतु तरीही ती अस्वच्छ असते. तर इतर देशात नदीला नदीसारखं बघत ती स्वच्छ ठेवतात. असा एक व्हिडीओ शेअर करुन शशांक लिहितो, "आपण घाबरायची गरज नाही, देव येऊन स्वच्छ करतील. सण महत्वाचे, निसर्ग नाही." अशी मार्मिक पोस्ट शशांकने केलीय. 


 

शशांकचं वर्कफ्रंट

शशांक केतकरने 'होणार सून मी या घरची' मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. या मालिकेतील श्री-जान्हवीच्या भूमिकांनी प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. या मालिकेनंतर शशांक 'हे मन बावरे' मालिकेत झळकला. सध्या शशांक स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेत झळकत आहे. या मालिकेतील रमा-अक्षय या जोडीने प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळवलंय. शशांकचंं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून त्याला मुलगाही आहे.

Web Title: muramba serial fame marathi actor shashank ketkar on river cleanliness in india ganga river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.