'मुस्कान' मालिका घेणार १४ वर्षांचा लिप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 10:06 AM2018-09-14T10:06:02+5:302018-09-14T10:06:34+5:30
मुस्कानला तर तिच्या आयुष्यात काही चांगले घडण्याची अपेक्षाच नाहीये, त्यामुळे आता रौनकच्या प्रवेशामुळे ह्या मालिकेत एक वेगळेच वळण येईल। काय हा मुस्कानसाठी आशेचा एक नवीन किरण असेल.
छोट्या पडद्यावरील मुस्कान मालिका आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात. त्यापैकीच ही एक मालिका आहे. आता या शोमध्ये असे काही घडणार आहे की ज्यामुळे रसिकांना धक्काच बसेल. ही मालिका फास्ट फॉरवर्ड होऊन तब्बल 14 वर्ष पुढे ढकलली जाणार आहे.
येणा-या कथानकात वेळेनुसार बदलही करण्यात आले आहेत. त्यानुसार शरद मल्होत्रा रौनकच्या रूपात आणि येशा रूघानी मुस्कानच्या रूपात दिसून येईल.ही मालिका आहे आरती आणि तिची मुलगी मुस्कान यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल आहे. मुस्कानला तर तिच्या आयुष्यात काही चांगले घडण्याची अपेक्षाच नाहीये, त्यामुळे आता रौनकच्या प्रवेशामुळे ह्या मालिकेत एक वेगळेच वळण येईल। काय हा मुस्कानसाठी आशेचा एक नवीन किरण असेल.
रौनकची भूमिका साकारण्याबद्दल शरद म्हणाला, “रौनकची भूमिका माझ्या हृदयाच्या अगदी जवळ आहे कारण त्यामुळे मला लिंग समानतेसारख्या समाजातील अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाचा हिस्सा बनता येणार आहे. रश्मी शर्मा टेलिफिल्म्स आणि स्टार भारतसोबत त्यांचा शो मुस्कानसाठी काम करताना मला खूप छान वाटतंय. वेश्यावस्तीच्या मर्यादित जागेतील ही एक उत्कट प्रेमकथा आहे. हे कथानक उत्तम आणि वेगळे आहे आणि ह्या सहकार्याबद्दल आम्ही खूप एक्सायटेड आणि आनंदी आहोत.”