Must See: बालपणी असे दिसायचे तुमचे लाडके टीव्ही स्टार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2017 05:41 AM2017-02-18T05:41:34+5:302017-02-18T11:11:34+5:30
छोट्या पडद्यावरील कलाकारांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट रसिकांना भावते. त्यांच्या विषयी प्रत्येक ...
छ ट्या पडद्यावरील कलाकारांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांची प्रत्येक गोष्ट रसिकांना भावते. त्यांच्या विषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक असतात. अशाच अनेक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे बालपण. आपले लाडके कलाकार बालपणी कसे दिसत असतील. ते कसे होते हे जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. बालपणी प्रत्येकजण धम्माल करतो. ही बालपणीची धम्माल मस्ती फोटोत कैद असते. फोटोमधूनच प्रत्येकजण आपल्या बालपणीच्या आठवणीत रमून जातो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या लाडक्या टीव्ही स्टार्सचे बालपणीचे फोटो
मौनी राय
देवो कें देव महादेव या मालिकेत पार्वती आणि नागिन-2 मालिकेतून रसिकांची लाडकी ठरलेली अभिनेत्री म्हणजे मौनी राय. नृत्य, संगीत आणि गायनाची पार्श्वभूमी असलेल्या घरात मौनीचा जन्म झाला. तिची आई उत्तम गायिका आहे. तर आजोबा थिएटर आर्टिस्ट. त्यामुळे बालपणापणापासून मौनीवर अभिनय आणि कलेचे संस्कार घडत होते. बालपणीच्या फोटोतही मौनी सुंदरपणे नटल्याचे पाहायला मिळत आहे.
दिशा वकाणी
छोट्या पडद्यावरील रसिकांची लाडकी व्यक्तीरेखा म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दयाबेन. या मालिकेतील दयाची प्रत्येक गोष्ट रसिकांना भावते. तिच्या अभिनयापासून ते गरब्यापर्यंत प्रत्येक गोष्ट रसिकांवर जादू करुन गेली आहे. गुजरातमध्ये जन्म झालेल्या दिशा बालपणापासूनच हसतमुख स्वभावाच्या असल्याचे त्यांच्या लहानपणीच्या फोटोकडे पाहून कळतंय. तेच हास्य, तशाच पद्धतीची गुजराती पद्धतीने साडी परिधान करणे या गोष्टी कुणालाही चटकन लक्षात येतील.
दिव्यांका त्रिपाठी
छोट्या पडद्यावरील आणखी एक लोकप्रिय नाव म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. ये है मोहब्बते मालिकेत साकारलेल्या इशिता अरोरा या भूमिकेमुळे दिव्यांका रसिकांची लाडकी बनली. बालपणी दिव्यांका आईची लाडकी होती. त्यामुळे आईने स्वतःच्या हाताने शिवलेले कपडेच ती परिधान करायची. बालपणी दिव्यांकाला टॉम बॉय लूक पसंत होता. त्यामुळेच दिव्यांकाने आपले केस छोटे छोटे ठेवले होते. अभिनयात नाव कमावणारी दिव्यांका शाळेत असताना एनसीसी कॅडेट होती. बंदूक चालवणे, तिरंदाजी तिचे फेव्हरेट होते. यांत तिने मेडल्सही जिंकले होते. बालपणापासूनच तिला लष्करी अधिकारी बनायचे होते. मात्र नियतीच्या मनात बहुदा तिने अभिनयात नाव कमवावं असंच बहुदा होतं.
सनाया इराणी
छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांचे मन जिंकणारी आणखी एक अभिनेत्री म्हणजे सनाया इराणी. इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेतील खुशी या भूमिकेने रसिकांवर जादू केली. निखळ सौंदर्य आणि अभिनय याचा उत्तम मेळ म्हणजे सनाया. बालपणीसुद्धा सनाया तितकीच गोड आणि सुंदर होती. फोनवर बोलतानाची सनायाची बालपणीची छबी कुणालाही तिच्या प्रेमात पाडेल.
निया शर्मा
काली एक अग्निपरीक्षा या मालिकेतून निया शर्माने छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री मारली. बहनें आणि एक हजारों में मेरी बहना है या मालिकांमधून नियाने आपल्या अभिनयाने छाप पाडली. मात्र जमाई राजा या मालिकेने नियाला खरी लोकप्रियता आणि ओळख मिळवून दिली. तिने साकारलेली रोशनी सा-यांनाच भावली. आशियातील तिसरी सगळ्यात सेक्सी महिला असा किताब एका मॅगझीनने दिलेली निया बालपणी तितकीच गोड आणि प्रेमळ असल्याचे तिच्या फोटोवरुन दिसतंय. या फोटोमध्ये नियाने एक सुंदरसा टेडी आपल्या हातात घेतला आहे.
रुपल त्यागी
रुपल एक अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक उत्तम कोरियोग्राफरसुद्धा आहे. सपने सुहाने लडकपन के मालिकेत रुपलने साकारलेली गुंजन ही भूमिका रसिकांवर जादू करुन गेली.
शक्ती अरोरा
बा, बहू और बेबी या मालिकेतील जिगर भूमिकेमुळे रसिकांमध्ये नवी ओळख निर्माण केलेला अभिनेता म्हणजे शक्ती अरोरा. याशिवाय पवित्र रिश्ता, तेरे लिये, मेरी आशिकी तुमसेंही है या मालिकांमध्येही त्याने भूमिका साकारल्या. हँडसम शक्ती अरोरा बालपणीसुद्धा तितकाच हँडसम होता.
सृष्टी झा
नेपाळच्या सरलाही या गावात जन्म झालेल्या अभिनेत्री सृष्टी झा हिने धूम मचाओ धूम या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री मारली. या मालिकेत तिने मालिनी शर्मा ही भूमिका साकारली होती. याशिवाय कुमकुम भाग्य या मालिकेतील प्रग्याची भूमिकाही तिला नवी ओळख देऊन गेली आहे.
रितविक धन्जानी
प्रसिद्ध अभिनेता आणि तितकाच लोकप्रिय होस्ट अशी ओळख निर्माण केलेले एक नाव म्हणजे रितविक धन्जानी. आपल्या अभिनयासोबतच विविध रियालिटी शो होस्ट करताना त्याचा अंदाज रसिकांची मनं जिंकून गेला आहे. रसिकांचा लाडका असलेला रितविक बालपणीसुद्धा तितकाच क्यूट असल्याचे त्याच्या बालपणीच्या फोटोवरुन दिसतंय.
बरुण सोबती
टीव्ही मालिका आणि सिनेमात आपल्या भूमिकांनी रसिकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे वरुण सोबती. श्रद्धा या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर एंट्री मारली. मात्र त्याला खरी ओळख मिळवून दिली ती इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेनं. याशिवाय बॉलीवुड सिनेमातही वरुण सोबतीने आपल्या अभिनयाने छाप पाडली आहे.