Bigg Boss Marathi Season 5 : "माझा वाद हा वाद नसतो तो बतंगड असतो"; निक्की तांबोळी स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 06:34 PM2024-07-30T18:34:55+5:302024-07-30T18:36:49+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : नव्या सीझनच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी घरातील सदस्यांसोबत वाद घालताना दिसून आली आहे. आता यावर तिने स्पष्टचं भाष्य केलं आहे.

"My argument is not an argument it is an argument"; Nikki Tamboli spoke clearly | Bigg Boss Marathi Season 5 : "माझा वाद हा वाद नसतो तो बतंगड असतो"; निक्की तांबोळी स्पष्टच बोलली

Bigg Boss Marathi Season 5 : "माझा वाद हा वाद नसतो तो बतंगड असतो"; निक्की तांबोळी स्पष्टच बोलली

'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi 5)च्या नव्या पर्वाचा आजचा भाग खूपच मनोरंजक असणार आहे. नव्या सीझनच्या सुरुवातीपासूनच बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) घरातील सदस्यांसोबत वाद घालताना दिसून आली आहे. आता यावर तिने स्पष्टचं भाष्य केलं आहे. जान्हवी किल्लेकर(Janhvi Killedar)सोबत बोलताना आजच्या भाागात निक्की तांबोळी म्हणाली, "माझा वाद हा वाद नसतो तो बतंगड असतो".

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात निक्की तांबोळी जान्हवीला म्हणते की,"निखिलने मला सांगितलं की तिने जे मागवलंय ते येतंय तर तुझं किनोवा पण येईल. त्यावर मी त्याला हो असं उत्तर दिले. पण यावर अंकिता वालावलकरने मात्र वेगळेच तोंड केले होते. तेव्हा माझी खूप सटकली आणि मी खरंच खूप सुनावले असते. पण मला खूप भूक लागली होती. त्यामुळे मला वातावरण खराब करायचे नव्हते. वेळ आल्यावर मी नक्की बोलेल.  छोट्या छोट्या गोष्टींवर मला वाद घालायचा नाही. कारण माझा वाद हा वाद नसतो तर तो बतंगडा असतो". निक्की तांबोळीच्या या बोलण्यावर जान्हवी मात्र जोरजोरात हसते. 


इरिना भांडी घासणार का?
दुसरीकडे निखिल दामले इरिना रूडाकोवाला विचारतो की, "तू भांडी घासू शकतेस ना? कारण तिथे अशी समज आहे की सूरज आणि तू भांडी घासणार आहात". त्यावर अंकिता म्हणते,"तिने अगदीच काही खाल्लेलं नाही. जेवणानंतर मी भांडी घासू शकते". पण इरिना म्हणते,"मी भांडी घासू शकते. पण सगळी भांडी घासू शकत नाही". त्यावर निखिल म्हणतो,"सूरज आहे तुझ्यासोबत..त्याने भांडी घासायला सुरुवातदेखील केली आहे". तर अंकिता इरिनाला विचारते,"तुला माणसं कमी पडत आहेत की तुला भांडी घासायची नाहीत. यावर इरिना म्हणते,"मी भांडी वापरली नाही.. तर मी का घासायची?". इरिनाला उत्तर देत निखिल म्हणतो,"अजून कोणाच्या ड्युटी ठरलेल्या नाहीत. उद्या ड्युटी ठरल्यानंतर तुझ्याकडे जर भांडी घासायची ड्यूटी असेल तर तेव्हा तुला तू त्या भांड्यांचा वापर केलाय की नाही याचा विचार न करता तुला ती सगळी भांडी घासावीच लागतील". बिग बॉस मराठी दररोज रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर पाहायला मिळणार आहे.

Web Title: "My argument is not an argument it is an argument"; Nikki Tamboli spoke clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.