'रंग माझा वेगळा' सीमाची होणार पोलखोल; दीपिकाच्या घरी राहायला येणार तिची खरी आई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 11:06 AM2022-05-24T11:06:12+5:302022-05-24T11:42:32+5:30

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेत काही दिवसांपूर्वी इनामदारांची घरी कार्तिकीची खोटी आई आली आहे.

'My color is different', the brass of the border will be exposed; Her real mother will be staying at Karthiki's house, a new twist will come in the series | 'रंग माझा वेगळा' सीमाची होणार पोलखोल; दीपिकाच्या घरी राहायला येणार तिची खरी आई

'रंग माझा वेगळा' सीमाची होणार पोलखोल; दीपिकाच्या घरी राहायला येणार तिची खरी आई

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिका गेल्या बऱ्याच दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. काही दिवसांपूर्वी इनामदारांची घरी कार्तिकीची खोटी आई आली आहे.  दीपिका तात्पुरती शांत राहावी म्हणून त्याने एका भलत्याच बाईचा फोटो तिला दाखवला आहे. तुझी आई तुझ्या लहानपणीच देवाघरी गेली, असे कार्तिकने दीपिकाला सांगतो. श्वेता त्या बाईला रस्त्यावर बघते आणि तिला पैसे देऊन दीपिकाची आई असल्याचं नाटक करण्यास सांगते. आता दिपिकाची खरी आई तिच्या घरी येणार आहे..

नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात कार्तिक दिपाला घरी येण्याची विनंती करतो. फक्त फोटोमुळे कार्तिकी सीमाला तिची आई समजते पण तूच तिला दाखवू शकतेस आई म्हणजे काय असते, असं कार्तिक दिपाला सांगतो. दीपा ही कार्तिकीसाठी पुन्हा इनामदारांच्या घरी यायला तयार होते. 

दिपा दिपिकाला घेऊन इनामदारांच्या घरी येते. दिपिकाला पाहून कार्तिकी खूश होते. कार्तिक कार्तिकीला आता दिपिका आणि दिपा इथंच राहणार असल्याचे सांगण्यात येतं. हे ऐकून कार्तिकीची खोटी आई म्हणून आलेल्या सीमा आणि श्वेताच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. दिपा परत इनामदारांची घरी आल्यामुळे सीमाचं पितळं उघड पडणार का?, कार्तिक आणि दिपाचं नातं पुन्हा बहरणार का?, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील. 

Web Title: 'My color is different', the brass of the border will be exposed; Her real mother will be staying at Karthiki's house, a new twist will come in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.