'मेरे साई' सेट सजावटीसाठी तोरलनेच बनवले पुष्पहार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 02:49 PM2018-07-20T14:49:33+5:302018-07-20T14:51:25+5:30

मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांसाठी मालिकेचा सेट जणू दुसरं घर आणि मालिकेतील कलाकार मिळून एक नवं कुटुंब बनतं.

'My sai' set made to make decorations to make decorative! | 'मेरे साई' सेट सजावटीसाठी तोरलनेच बनवले पुष्पहार!

'मेरे साई' सेट सजावटीसाठी तोरलनेच बनवले पुष्पहार!

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांचं शेड्युल भलतंच बिझी असतं. दिवसाचे १७ ते १८ तासांचं शुटिंग यामुळे त्यांचा बराच वेळ हा मालिकांच्या सेटवरच जातो. या सगळ्या गोष्टींमुळे मालिकांमध्ये काम करणा-या कलाकारांसाठी मालिकेचा सेट जणू दुसरं घर आणि मालिकेतील कलाकार मिळून एक नवं कुटुंब बनतं. मालिकेतील कलाकारांमध्ये काम करता करता एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण होतं. 

 
‘मेरे साई’ मालिकेत बायजाची भूमिका साकारणारी तोरल रसपुत्र अलीकडे तिच्या आवडत्या गोष्टी करण्यात वेळ घालावायची.मालिकेत लवचर सणांचे सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे.सणासुदीच्या दृश्यासाठी तोरलने स्वत:च्या हातांनी बनवलेल्या फुलांच्या माळांनी सेट सुशोभित केला आहे. अलीकडे सुरू असलेल्या कथानकानुसार व्यक्तिरेखांच्या लुकमध्ये देखील थोडा फरक झाला आहे. शिर्डी गावातील जुन्या शनि मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या निमित्ताने शिर्डी गावात मोठा सोहळा होणार आहे.त्या निमित्ताने उत्सव साजरा होणार आहे.या सोहळ्यात, तोरल आपल्या बदललेल्या रूपात फुलांच्या माळा करताना दिसेल. या दृश्याचे चित्रीकरण करताना तिने खरोखरच सेट सजवण्यासाठी  बर्‍याच माळा बनवल्या होत्या.

 
तोरलशी बोलले असता तिने  सांगितले की,“मेरे साईचे ते एक खूप छान चित्रीकरण होते,जेव्हा आम्ही शनि मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या निमित्ताने उत्सव साजरा करतो. खरे म्हणजे फुलांच्या माळा बनवण्यात मी इतकी रंगून गेले होते की मी इतक्या माळा केल्या हे माझ्या ध्यानातच आले नव्हते. मला फुलांचे हार करायला आवडतात आणि आमच्या घरी जेव्हा एखादी पूजा असते, त्यावेळी हार माळण्याचे काम माझ्यावरच सोपवले जाते. मी विश्रांतीच्या वेळेत देखील पुष्पहार बनवत होते. मंदिराच्या सेटसाठी आवश्यक होत्या त्यापेक्षा जास्त माळा मी बनवल्या होत्या. मला तर वाटत होते, की एखाद्या सणाच्या निमित्ताने मी माझे घरच सुशोभित करत होते.”

शिर्डी येथील साईंच्या समाधीला 100 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मालिकेची सुरुवात झाली होती. या मालिकेत अबीर सुफी साईबाबांची भूमिका साकारत असून त्याचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे.या मालिकेच्या कथानकाला लवकरच एक वळण मिळणार.या मालिकेत प्रेक्षकांना एक नवीन कलाकार दिसणार असून ही कलाकार छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध कलाकार आहे. 'मेरे साई' या मालिकेत नुकतीच स्नेहा वाघ दाखल झाली आहे. या मालिकेत काम करायला मिळत असल्याने स्नेहा वाघ सध्या चांगलीच खूश आहे.

Web Title: 'My sai' set made to make decorations to make decorative!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.