कित्येक दिवस व्हेंटिलेटरवर होती ही अभिनेत्री, घरी परतल्यानंतर व्हिडीओ शेअर करत सांगितली परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 03:16 PM2023-01-12T15:16:35+5:302023-01-12T15:19:54+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात दाखल होती. त्यानंतर तिला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आता ती घरी परतली आहे.

Naagin 6 actress Mahekk chahal returned home after being on icu ventilator shared health update video | कित्येक दिवस व्हेंटिलेटरवर होती ही अभिनेत्री, घरी परतल्यानंतर व्हिडीओ शेअर करत सांगितली परिस्थिती

कित्येक दिवस व्हेंटिलेटरवर होती ही अभिनेत्री, घरी परतल्यानंतर व्हिडीओ शेअर करत सांगितली परिस्थिती

googlenewsNext

Mahekk Chahal: 'बिग बॉस सीझन 5' आणि 'नागिन 6' फेम महेक चहल(Mahek Chahal)ची गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात दाखल होती. . मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आता महेक चहलच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. महेक आता रुग्णालयातून घरी परतली असून तिने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट्स देताना दिसली.


न्यूमोनियामुळे बिघडली होती तब्येत  
या व्हिडिओमध्ये महेक  (Mahekk Chahal) बेडवर झोपलेली दिसत आहे.आपल्या तब्येतीबद्दल बोलताना महेक चहल म्हणाली- ''मला न्यूमोनिया झाला होता. पण आता मी पूर्वीपेक्षा बरी आहे. मला सर्दी झाली होती पण मी आधी त्याकडे दुर्लक्ष केले, नंतर मला न्यूमोनिया झाला. कामामुळे मला पूर्वी खूप प्रवास करावा लागत होता. या कारणास्तव ती त्याकडे दुर्लक्ष करत होती. 

यासोबतच मेहकने व्हिडीओच्या शेवटी चाहत्यांना आवाहन केले आणि म्हणाली- ''श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखत असेल तर दुर्लक्ष करु नका. ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.'' 2 जानेवारीला अचानक महेक कोसळली होती, तिला श्वास घेता येत नव्हता. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि डॉक्टरांनी तिला लगेच एडमिट केले. तिचं सीटी स्कॅन झाले.

 महेक सलमान खानच्या रिएलिटी शो 'बिग बॉस'च्या 5 व्या सीझनमध्ये देखील सहभागी झाली होती. याशिवाय तिने अनेक बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Naagin 6 actress Mahekk chahal returned home after being on icu ventilator shared health update video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.