प्रेमात फसवणूक...आईचं छत्रही हरपले..नागिन फेम अभिनेत्रीच्या आयुष्यात आलं होतं वादळ,म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 18:20 IST2023-01-24T18:14:24+5:302023-01-24T18:20:48+5:30
अभिनेत्री म्हणाली, मी तुटले होते. मी घरातून बाहेर पडत नव्हते. काय करावे समजत नव्हते. त्यावेळी माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे.

प्रेमात फसवणूक...आईचं छत्रही हरपले..नागिन फेम अभिनेत्रीच्या आयुष्यात आलं होतं वादळ,म्हणाली...
अदा खान (Adaa khan) टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अदाने आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप कमीवेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अदाने ज्या काही मालिकांमध्ये अभिनय केला, त्या लोकप्रिय ठरल्या. अभिनयाच्या दुनियेत अदाची जादू चालली होती, पण खऱ्या आयुष्यात तिच्या आयुष्यात अनेक वादळ आली.
अदा खानच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा ती आतून तुटली होती. अदा खानची प्रेमात फसवणूक झाली होती. याच दरम्यान अभिनेत्रीनं आपल्या आई देखील गमावलं होतं. त्यावेळी तिच्या वेदना असाह्य झाल्या होत्या. एकदा राजीव खंडेलवाल (Rajeev Khandelwal) शी संवाद साधताना अदा खानने तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळाबाबत सांगितले.
अदा खानचे 6 वर्षांचे तुटलेले नातं
अदा खान म्हटले होते की, “जेव्हा तुम्ही एखाद्या नात्याला चार वर्षे देता आणि ती व्यक्ती तुमची फसवणूक करते. तुम्ही तरीही तिल संधी देता आणि नंतरही तेच होते. याप्रमाणे हे नातं सहा वर्षे टिकलं. माणूस प्रेमात असताना खूप काही देतो मी ही दिले. पण मला आता प्रेम नाही करायचं, अदा खानने सांगितले होते की, जेव्हा तिच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे अभिनेत्रीही डिप्रेशनमध्ये गेली होती.
आत्महत्येचाही याचा विचार
राजीवसोबतच्या संवादात अदा खान म्हणाली, “मी माझी आईही गमावली होती. तुम्हाला त्या व्यक्तीची सर्वात जास्त गरज असताना ही घटना घडली. मी तुटले होते. मी घरातून बाहेर पडत नव्हते. काय करावे समजत नव्हते. जेव्हा तुमची आई हे तुमचे जग असते आणि ज्यावर तुम्ही प्रेम करता ते दुसरे जग असते. त्यावेळी माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. माझ्यासाठी ही परिस्थिती फार कठीण झाली होती. माझी आई माझी ताकद होती. ती गेल्यावर मी पूर्णपणे कोलमडून पडले होते. डिप्रेशनमध्ये होते. खूप वाईट अवस्था झाली होती.