एकता कपूरने स्विमिंग पूलमध्ये घेतले ‘नागिन 5’चे ऑडिशन, क्षणात व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 15:33 IST2020-01-01T15:32:20+5:302020-01-01T15:33:36+5:30
‘नागिन 5’ची घोषणा!!!

एकता कपूरने स्विमिंग पूलमध्ये घेतले ‘नागिन 5’चे ऑडिशन, क्षणात व्हिडीओ झाला व्हायरल
‘नागिन’ या छोट्या पडद्यावरच्या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले. काहीच दिवसांपासून या मालिकेचे चौथे सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. जस्मिन भसीन आणि निया शर्मा ‘नागिन 4’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. ‘नागिन 4’ टीव्हीवर गाजत असतानाच आता या मालिकेची निर्माती एकता कपूरने ‘नागिन 5’ची घोषणा केली आहे. होय, एकता कपूर ‘नागिन 5’चे ऑडिशन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
एकता कपूरने स्वत: हा व्हिडीओ शेअर केला आणि शेअर करताच तो व्हायरल झाला. या व्हिडीओच्या सुरुवातीला एकता ती ‘नागिन 5’चे ऑडिशन घेत असल्याचे सांगते आणि मग कॅमेरा स्विमींग पूलमध्ये मस्ती करत असलेल्या अनिता हसनंदानी, रिद्धिमा पंडित आणि करिश्मा तन्नाकडे वळतो. स्वीमिंग पूलमध्ये या तिघी नागीन डान्स करताना दिसतात. हा तिघींचा नागीन डान्स तुफान व्हायरल होतोय.
आता हा व्हिडीओ फक्त गंमत म्हणून शूट करण्यात आलाय हे नव्याने सांगायची गरज नसावी. सध्या एकता कपूर थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिच्यासोबत अनिता हसनंदानी, करिश्मा टंडना, विकास गुप्ता, रोहित रेड्डी आणि रिधिमा पंडित असे सगळे आहेत. याचदरम्यान हा व्हिडीओ शूट केला गेला आहे.
‘नागिन 4’ बद्दल सांगायचे झाल्यास, नुकतीच ही मालिका सुरु झाली. या मालिकेत अभिनेत्री निया शर्मा, विजेंद्र कुमेरिया, सायंतनी घोष आणि जॅसमीन भसीन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. टीव्ही क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता ‘नागिन’ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची मध्यंतरी चर्चा होती. या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ किंवा प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. अर्थात यावर एकताने अद्याप कुठलेही अधिकृत भाष्य केलेले नाही.