'नाच गं घुमा'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये धमालमस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 01:43 PM2024-05-11T13:43:23+5:302024-05-11T13:43:47+5:30

Hasatay Na? Hasaylach Pahije! : डॉ. निलेश साबळे 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा नवीन शो कलर्स मराठीवर रसिकांच्या भेटीला घेऊन आला आहे. या नव्या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकवर्ग नवीन एपिसोडची आतुरतेने वाट पाहात असतात.

'Nach Ga Ghuma' team's will be seen in 'Hasatay Na? Hasaylach Pahije!' | 'नाच गं घुमा'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये धमालमस्ती

'नाच गं घुमा'च्या टीमची 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोमध्ये धमालमस्ती

डॉ. निलेश साबळे (Dr.Nilesh Sable) 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' (Hastay Na Hasaylach Pahije Show) हा नवीन शो कलर्स मराठीवर रसिकांच्या भेटीला घेऊन आला आहे. या नव्या शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकवर्ग नवीन एपिसोडची आतुरतेने वाट पाहात असतात. आता नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोत निलेश साबळे आणि ओंकार भोजने यांच्या विनोदावर 'नाच गं घुमा' चित्रपटाची संपूर्ण टीम एन्जॅाय करताना दिसत आहे.

सुपर्णा शाम, भाऊ कदम अन् ओंकार भोजने यांच्या विनोदांवर स्वप्नील जोशी, सारंग साठे , सुकन्या मोने , सुप्रिया पाठारे , शर्मिष्ठा राऊत , मधुगंधा कुलकर्णी आणि मायरा वायकुळ सगळेच लोटपोट हसताना दिसत आहेत. इतकंच नाही तर, चित्रपटाच्या संपूर्ण टीमने चांगलाच हास्यकल्लोळ केल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ओंकारच्या विनोदांवर चित्रपटाच्या संपूर्ण टीम सोबत मुंबई पोलीस लेडीज कॉन्स्टेबल देखील एन्जॉय करताना दिसत असून एकंदरीत या मंचावरती संपूर्ण टीम धमाल करणार असल्याचे व्हिडीओतून दिसून येतेय.

हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या या नवीन प्रोमोला चाहत्यांनीही लाइक्स व कमेंट्स करत भरभरून प्रतिसाद दिला. रसिकवर्ग आता  या संपूर्ण एपिसोडची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा नवीन शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला दिसत आहे. या शोचे लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन डॉ. निलेश साबळे करत आहेत.  तर भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचा समावेश आहे.

Web Title: 'Nach Ga Ghuma' team's will be seen in 'Hasatay Na? Hasaylach Pahije!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.