'नागिन 2' फेम करनवीर बोहराच्या गाडीला ट्रकच्या धडकेने झाला अपघात, थोडक्यात वाचला हा अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2017 10:08 AM2017-03-08T10:08:29+5:302017-03-08T15:38:29+5:30
'नागिन 2' मालिकेत रॉकी अखिलेश राजा ही भूमिका साकारणारा करणवीर बोहराच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे.करणवीर 'हमे तुमसे ...
' ;नागिन 2' मालिकेत रॉकी अखिलेश राजा ही भूमिका साकारणारा करणवीर बोहराच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे.करणवीर 'हमे तुमसे प्यार कितना' या सिनेमातील गाण्याच्या शूटिंगसाठी भूजला कारने जात असताना त्याच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात करणवीर गंभीर दुखापत झाली असून मुक्का मार लागला असल्याचे कळतेय.या अपघातात करणवीर ज्या गाडीने प्रवास करत होता.त्या गाडीची पूर्ण चुराडाचा झाल्याचे पाहायला मिळत आहे.यावेळी कारमध्ये त्याच्यासह त्याची सहकलाकार प्रिया बॅनर्जी आणि त्याची बहिण मिनाक्षीही होती. थोडक्यात हे तिघे बचावले असून तिघांनी जास्त दुखापत झालेली नाहीय. अपघात झाल्यानंतर करणवीरने तिथेच ते शूट रद्द केले आणि परत मुंबईला परतला.समोरून येणा-या भरधाव वेगाने येणा-या ट्रकच्या धडकेत यांचा अपघात झाल्याचे कळतंय.याविषयी करणवीरशी चौकशी केले असता त्याने सांगितले की, अचानक समोर ट्रक आला आणि काहीक्षणात काय झाले तेच कळाले नाही. त्यावेळी आम्ही तिघेही खूप घआबरलो होतो.माझ्यापेक्षा मला प्रिया आणि बहिण मिनाक्षी सुखरूप आहेत ना हीच काळजी जास्त होती. देवाच्या कृपेने आम्ही या अपघातातून सुखरूप बचावलो. गाडीला ट्रकची धडक बसल्याने गाडीचे नुकसान झाले आहे.आम्हाला तिघांनाही मुक्कामार लागला आहे. त्यामुळे त्वरित शूटिंग रद्द करत आधी मुंबईला रवाना झालो. हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. देवाच्या कृपेनेच आम्ही बचावलो असल्याचे करणवीरने सांगितले.सध्या तो आराम करत असून पुढच्या आठवड्यापासून पुन्हा शूटिंगला सुरूवात करणार असल्याचे कळते आहे.