‘सूर राहू दे’ मालिकेत आता आरोहीच्या भूमिकेत दिसणार नक्षत्रा मेढेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 11:47 AM2018-12-21T11:47:26+5:302018-12-21T11:49:05+5:30
अभिनय करताना मी प्रत्येक गोष्टीचे बारकावे लक्षात घेऊन त्यावर अधिकाधिक मेहनत घेते. त्यामुळे आरोहीची भूमिका साकारताना खूप मदत झाली असल्याचे नक्षत्रा मेढेकरने सांगितले.
'सूर राहू दे' या मालिकेवर आणि त्यातील कलाकारांवर सुरुवाती पासूनच प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. आता या मालिकेत एक प्रमुख बदल होणार आहे. मालिकेतील आरोहीच्या मुख्य भूमिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर दिसणार आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा आहे. नक्षत्रा एक सध्या सरळ भावनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल मुलगा आहे. भावणीकता आणि व्यवहारिकता यांची सांगड घालणारी ही कथा 'सूर राहू दे' या मालिकेतून प्रेक्षकाना दिसत आहे. शांत आणि धैर्यशाली असलेली आरोहीची व्यक्तिरेखा नक्षत्राने आधी साकारलेल्या भूमिकांपेक्षावेगळी आहे. नक्षत्राने याआधी नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत आणि म्हणूनच 'सूर राहू दे' मधील आरोहीची व्यक्तिरेखा साकारणं तिच्यासाठी आव्हानात्मक आहे.
या भूमिकेबद्दल विचारले असता नक्षत्रा म्हणाली , " लहानपणापासूनच मला हिंदी मालिका पाहण्याची प्रचंड आवड होती . प्रत्येक मालिकेच्या कथानकाबद्दल मी अप टू डेट असायची . मात्र तेव्हा कधीहीपुढे जाऊन मी स्वतः अभिनेत्री होईन अशी पुसटशी कल्पना मला नव्हती . मला इतरांसारखं नोकरी करायची नव्हती पण नेहमीपेक्षा काहीतरी हटके करण्याची खूप इच्छा होती. त्यात मला इंडस्ट्रीने स्वतःआपल्यात सामावून घेतले आणि मी सुद्धा अगदी मनापासून ते स्वीकारले . अभिनय करताना मी प्रत्येक गोष्टीचे बारकावे लक्षात घेऊन त्यावर अधिकाधिक मेहनत घेते . त्यामुळे आरोहीची भूमिका साकारताना खूप मदत झाली . "
विशेष म्हणजे पडद्यावरच्या कलाकारांना आपण नेहमी वेगवेगळ्या रुपात पाहतो...मात्र त्यासाठी हे कलाकारही प्रचंड मेहनत घेतात.... वर्षाचे 365 दिवस आनंदी राहण्यासाठी त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते ... त्यासाठी त्यांना कायम फिट राहावं लागतं.मी ही अगदी त्याचप्रमाणे चांगली कलाकार बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. साचेबद्ध कामात न अडकता रसिकांना माझ्याकडून काय नवीन देता येइल याकडेच माझे लक्ष असलणार आहे. त्यासाठी मी करिअरच्या सुरूवातीपासूनच या इंडस्ट्रीतले बारकावे समजून घेण्याचाही प्रयत्न करत असल्याचे तिने सांगितले आहे.