नलू मावशीच्या खऱ्या आयुष्यातील लाईफ पार्टनरबद्दल या गोष्टी माहितीय का ?अमेरिकेत राहून करतो हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 09:00 AM2021-09-20T09:00:00+5:302021-09-20T09:00:00+5:30

दिप्ती केतकरने तिच्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकलेली असली तरी सौंदर्यानेही ती रसिकांची मनं जिंकत असते. ऑनस्क्रीन सोज्वळ रुपात दिसत असणारी नलू म्हणजे दिप्ती खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस आहे.

Nalu's aunt's real-life husband is Layabhari, who works in the United States | नलू मावशीच्या खऱ्या आयुष्यातील लाईफ पार्टनरबद्दल या गोष्टी माहितीय का ?अमेरिकेत राहून करतो हे काम

नलू मावशीच्या खऱ्या आयुष्यातील लाईफ पार्टनरबद्दल या गोष्टी माहितीय का ?अमेरिकेत राहून करतो हे काम

googlenewsNext

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत नलु मावशीला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. आज घराघरात नलू मावशी प्रसिद्ध आहे. नलू मावशी साकारणारी अभिनेत्रीचे नाव आहे दिप्ती केतकर. 'अवघाची संसार' या मालिकेतून दीप्तीने पहिल्यांदाच मालिकेत काम केले होते. यासोबतच 'भागो मोहन प्यारे', हम तो तेरे आशिक है मालिकेही ती झळकली आहे. 

दिप्तीला खरी लोकप्रियता 'मला सासू हवी' मालिकेतील अभिलाषाच्या भूमिकेतून मिळाली. मालिकाच नाही तर सिनेमातही तिने काम केले आहे. चल गंमत करू, सनई चौघडे, भक्ती हीच खरी शक्ती या सिनेमांमध्येही दीप्तीने काम केले आहे. दिप्ती उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम नृत्यांगनाही आहे. तिने फ्रान्समध्ये झालेल्या एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील केलं होतं. 

दिप्ती केतकरने तिच्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकलेली असली तरी सौंदर्यानेही ती रसिकांची मनं जिंकत असते. ऑनस्क्रीन सोज्वळ रुपात दिसत असणारी नलू म्हणजे दिप्ती खऱ्या आयुष्यात मात्र फारच ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे विविध अंंदाजातील फोटो पाहायला मिळतील. व्हिडीओ फोटो आणि खासगी आयुष्यात कुटुंबासोबत एन्जॉय केलेल्या खास क्षणांचेही ती फोटो शेअर करत असते. 

सोशल मीडियावर मालिकेतल्या तिच्या लूकमुळे अनेकदा चाहते ट्रोल करताना दिसतात.अतिशय साध्या लूकमध्ये नलू मावशी मालिकेत झळकते. पण खऱ्या आयुष्यात मात्र नलू मावशी अगदी वेगळी आहे. ग्लॅमरस राहायला तिला आवडतं. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तिच्या विविध अदा पाहायला मिळतात. तिचे सौंदर्य पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. 

दीप्ती केतकरने रोमित केतकरसह संसार थाटला आहे. यांचे लव्हमॅरेज आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. रोमित केतकरचा अभिनयाशी काहीही संबंध नसला तरी अमेरिकेत इंजिनिअर म्हणून ते काम करतात.

सोशल मीडियावर दोघांचेही फोटो पाहायला मिळतात . दिप्तीचे रोमितसोबत खूपच कमी फोटो असल्यामुळे त्याच्याविषयी फारसे कोणाला माहिती नाहीय.

Web Title: Nalu's aunt's real-life husband is Layabhari, who works in the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.