​संजय स्वराज आणि श्रुती उल्फतची नामकरणमध्ये जमली जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2017 09:55 AM2017-03-15T09:55:38+5:302017-03-15T15:25:38+5:30

श्रुती उल्फत आणि संजय स्वराज यांनी जमाई राजा या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्या दोघींनी रवी दुबेच्या ...

In the name of Sanjay Swaraj and Shruti Uthat, | ​संजय स्वराज आणि श्रुती उल्फतची नामकरणमध्ये जमली जोडी

​संजय स्वराज आणि श्रुती उल्फतची नामकरणमध्ये जमली जोडी

googlenewsNext
रुती उल्फत आणि संजय स्वराज यांनी जमाई राजा या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्या दोघींनी रवी दुबेच्या आई वडिलांची भूमिका साकारली होती. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती आणि आता ते दोघे एका मालिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळणार आहेत.
नामकरण या मालिकेत नुकताच 15 वर्षांचा लीप घेण्यात आला आहे. लीपनंतर ही मालिका अधिक मनोरंजक बनली असून या मालिकेच्या कथानकाला अनेक वळणे मिळाली आहेत. या मालिकेत अवनीची भूमिका आदिती राठोड साकारत असून अनेक कलाकारांमधून या भूमिकेसाठी तिची निवड करण्यात आलेली आहे. अवनीच्या आयुष्यात आता अनेक नवी वळणे येणार असून आदिती ही भूमिका अधिक चांगल्याप्रकारे साकारेल असा आदितीला विश्वास आहे. अवनी ही भूमिका प्रेक्षकांची प्रचंड लाडकी असल्याने एक अभिनेत्री म्हणून आदितीची जबाबदारी वाढली आहे. या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा ती प्रयत्न करणार असल्याचे ती सांगते. 
नामकरण या मालिकेत श्रुती उल्फत झळकणार असून ती या मालिकेत एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारणार आहे. अतिशय लाऊड अशी ही व्यक्तिरेखा आहे. या मालिकेत संजय स्वराज तिच्या पतीच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या दोघांची खट्टी मिठी केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडेल अशी सगळ्यांना खात्री आहे. या दोघांची जोडी खूप मजेदार असून त्यांची प्यारी नोकझोक प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे. श्रुतीसोबत पुन्हा काम करण्यास संजय खूप उत्सुक आहे. तो सांगतो, "हा खूपच छान योगायोग आहे. मी पुन्हा एकदा श्रुतीसोबत काम करण्यासाठी खूप खूश आहे. या मालिकेद्वारे मी आणि श्रुती प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला विश्वास आहे की, माझी आणि श्रुतीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडेल."



Web Title: In the name of Sanjay Swaraj and Shruti Uthat,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.