सुपर डान्सर २ चा स्पर्धक आकाश वर्माने अनुराग बासू यांना दिले हे नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 06:43 AM2017-09-26T06:43:30+5:302017-09-26T12:13:30+5:30
सुपर डान्सरचा नवा सिझन सोनी एन्टरटेनमेन्टवर लवकरच सुरू होणार आहे. या शोचे आतापर्यंतचे सगळेच सिझन हिट गेले असल्यामुळे हा ...
स पर डान्सरचा नवा सिझन सोनी एन्टरटेनमेन्टवर लवकरच सुरू होणार आहे. या शोचे आतापर्यंतचे सगळेच सिझन हिट गेले असल्यामुळे हा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांना या सिझनकडून देखील खूप साऱ्या अपेक्षा आहेत. या सिझनसाठी देशातील विविध शहरात ऑडिशन्स घेण्यात आल्या आहेत आणि या ऑडिशन्समधून एकूण १२ स्पर्धक निवडले गेले आहेत आणि लवकरच त्यांचे धमाकेदार नृत्य प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत.
सुपर डान्सरच्या आजवरच्या सगळ्या सिझनमध्ये शिल्पा शेट्टी कुंद्रा, अनुराग बासू आणि गीता कपूर यांनी परीक्षक म्हणून हजेरी लावली आहे. आता या सिझनमध्ये देखील हेच परीक्षक आपल्याला परीक्षकाच्या खुर्चीत बसलेले दिसणार आहेत.
लहान मुले असल्यामुळे सुपर डान्सरच्या चित्रीकरणाच्यावेळी खूपच मजा येते. सेटवर लहान मुलांसोबत शिल्पा, गीता आणि अनुराग हे तिघे देखील लहान मुलेच बनून जातात आणि त्यांच्यासोबत खूप मजा मस्ती करतात. त्यामुळे त्यांना देखील ते काम करत आहेत असे वाटतच नाही.
गाझियाबादमधील आर्यन वर्मा नावाचा एक स्पर्धक प्रेक्षकांना या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या आर्यनने ऑडिशनच्या वेळेसच सगळ्या परीक्षकांना त्याने प्रभावित केले होते. या १२ वर्षांच्या मुलाने आपल्या कामगिरीने प्रत्येकाला आश्चर्यचकित केले होते. तो खूपच चांगला डान्सर आहे. तसेच तो तितकाच बडबडा देखील आहे. आपली स्पर्धेत निवड व्हावी यासाठी ऑडिशनला येताना अनुराग बासू यांच्यासाठी त्याने गुलाब जामून भेट म्हणून आणले होते. अनुरागला लाच दिली तर त्याची या कार्यक्रमात निवड होईल असा त्याचा समज होते. हे कळल्यावर तर सगळ्या परीक्षकांना प्रचंड हसू आले होते. तुम्ही गुलाब जामून सारखे दिसता त्यामुळे मी तुम्हाला गुलाब जामून घेऊन आलो आहे असे आर्यनने सांगितल्यावर तर उपस्थितांना त्यांचे हसू आवरत नव्हते. आता तर तो अनुराग बासू यांना गुलाब जामून या नावानेच हाक मारायला लागला आहे.
Also Read : पहिल्यांदाच शिल्पा शेट्टीच्या मुलाची दिसणार ऑनस्क्रीन झलक