'रोजचं ट्रॅफिक, काय करायचं घोडबंदर रोडचं'; नम्रता संभेरावची फेसबुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 02:45 PM2023-10-11T14:45:17+5:302023-10-11T14:46:05+5:30

नम्रतानं घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीसंदर्भात एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.

Namrata Sambherao Facebook post on Ghodbunder Road traffic | 'रोजचं ट्रॅफिक, काय करायचं घोडबंदर रोडचं'; नम्रता संभेरावची फेसबुक पोस्ट

Namrata Sambherao

छोट्या पडद्यावरून प्रसारित झालेला महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय झाला. या कार्यक्रमातील सर्व कलाकारांवर प्रेक्षकही भरभरून प्रेम करतात. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. अभिनयाबरोबरच नम्रता सोशल मीडियावर देखील खूपच सक्रीय असते. सोशल मीडियावरून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. सोशल मीडियावर ती कामासंदर्भात चाहत्यांना माहिती देत असते. आता नम्रतानं घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीसंदर्भात एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

नम्रतानं पोस्टमध्ये लिहलं, "काय करायचं घोडबंदर रोडचं , लोडेड ट्रक टेम्पो पलटी होतायत. साधारण रोजचा प्रवास असल्याने मी सांगू शकते, किमान 95 टक्के प्रमाण आहे. बरं नेमका प्रकार काय घडलाय त्याचा ही थांगपत्ता लागत नाही. कारण कधीकधी विनाकारण ट्रॅफिक लागतं. त्यामुळे हातावर हात धरून बसणे एवढाच पर्याय. सुखसोयी असलेले मोठमोठाले टॉवर झालेत खरं, पण सुखाचा प्रवास कसा होईल, ह्याची पण काळजी घ्यायला हवी. मेट्रोचं काम चालू आहे पण ती सुद्धा गायमुख पर्यंत जिथून खरं पुढे ट्रॅफिकला सुरुवात होते. अर्ध्या तासाच्या रस्त्याला 2 ते 3 तास लागतात. काय होऊ शकतं यावर". तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. . एका नेटकऱ्यानं कमेंट केली, आपण फक्त मनातल्या मनात संताप करू शकतो. अजून काय?. 


नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रामधील तिची अनेक पात्र प्रेक्षकांच्या आवडीची आहेत.  लॉली असो अथवा सासू सूनेच्या स्किटमधील सूनेचं पात्र, अगं अगं आईच्या स्किटमधील साधी भोळी आईची भूमिका, ती अगदी सहजरित्या करते. आता नम्रता तिच्या नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. प्रसाद खांडेकरचं दिग्दर्शन असलेल्या एका चित्रपटातून ती मुख्य भूमिका साकारणार आहे. याआधी नम्रताने अनेक नाटकांमध्येही काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.

Web Title: Namrata Sambherao Facebook post on Ghodbunder Road traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.