"बबडी आमची खरीखुरी पोरगी...", नम्रता संभेरावने वनिता खरातला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 14:13 IST2024-07-19T14:12:50+5:302024-07-19T14:13:47+5:30
Vanita Kharat : आज वनिता खरात हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने नम्रता आवटे हिने तिच्यासोबत फोटो शेअर करत खास पोस्ट शेअर केली आहे.

"बबडी आमची खरीखुरी पोरगी...", नम्रता संभेरावने वनिता खरातला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
महाराष्ट्राची हास्यजत्रा(Maharashtrachi Hasyajatra)मधून अनेक विनोदवीर घराघरात पोहचले. यात ओंकार भोजने, गौरव मोरे, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, नम्रता संभेराव, वनिता खरात या कलाकारांचा समावेश आहे. हे कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते. आज वनिता खरात (Vanita Kharat) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने नम्रता आवटे-संभेराव (Namrata Awate-Sambherao) हिने तिच्यासोबत फोटो शेअर करत खास पोस्ट शेअर केली आहे.
नम्रता आवटे-संभेराव हिने वनिता खरातसोबतचा एक फोटो आणि दुसऱ्या फोटोत महाराष्ट्राची हास्यजत्रामधील गर्ल गँग पाहायला मिळत आहे. फोटो शेअर करत नम्रताने लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा वनी. बबडी आमची खरी खुरी पोरगी. माझ्या आयुष्यात अशी हि एकमेव मैत्रीण आहे जी राग प्रेम लोभ सगळंच व्यक्त करते म्हणून मला वनी जास्त आवडते. अप्रतिम अभिनेत्री. तुझा अभिनय खरेपणा आणि आपली मैत्री अशीच बहरत राहो.
वर्कफ्रंट
वनिताने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सोबतच तिने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. शाहिद कपूरच्या 'कबीर सिंह' या सिनेमात ती झळकली आहे. ती लवकरच 'येरे येरे पैसा ३' सिनेमात दिसणार आहे. तर नम्रता संभेरावच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नाच गं घुमा या सिनेमात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचं सर्वत्र खूप कौतुक झाले.