बिग बॉस मराठीच्या घरामधून नंदकिशोर चौघुले घराबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 09:46 IST2018-07-09T09:43:58+5:302018-07-09T09:46:20+5:30
बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये नंदकिशोर चौघुलेला घराबाहेर जावे लागले. नंदकिशोर वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आला होता. पाच आठवडे तो या घरामध्ये राहिला.

बिग बॉस मराठीच्या घरामधून नंदकिशोर चौघुले घराबाहेर
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता फक्त आठ सदस्य उरले आहेत. शेवटचे काही आठवडे आता उरल्यामुळे आता हा गेम खूप कठीण होत जाणार हे नक्कीच. या आठ सदस्यांमधून एक सदस्य आज घराबाहेर गेला. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फक्त सात सदस्य उरले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सगळ्याच स्पर्धकांमध्ये आता अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी चुरस रंगणार आहे. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य होते. या आठवड्यामध्ये शर्मिष्ठा आणि नंदकिशोर चौघुले डेंजर झोनमध्ये आले. बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये नंदकिशोर चौघुलेला घराबाहेर जावे लागले. नंदकिशोर वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आला होता. पाच आठवडे तो या घरामध्ये राहिला.
बिग बॉस मराठीचा हा आठवडा पुष्कर, मेघा, सई यांच्या ग्रुपसाठी थोडा तणावाचा आणि वाद विवादांचा ठरला. पुष्कर आणि सई यांनी मेघावर असलेली नाराजी व्यक्त केली. पुष्कर, सई, रेशम, आस्ताद, नंदकिशोर हे सगळेच मेघा विरोधात आले. या WEEKEND चा डाव मध्ये सदस्यांनी एकमेकांना पत्र लिहिली. मेघाने शर्मिष्ठाला पत्र लिहिले तर पुष्कर आणि सईने एकमेकांना. आस्ताद आणि स्मिताने रेशमला पत्र लिहिले तर नंदकिशोर यांनी मेघाला पत्र लिहिले. या पत्रामधून सदस्यांनी त्यांना वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या.
नंदकिशोर चौघुले या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडले. या घरामध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल? आणि कोण घराबाहेर जाईल? हे बघणे रंजक असणार आहे.
बिग बॉस मराठी या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील आपलाच आवडता स्पर्धक विजेता असावा असे प्रत्येकाला वाटत आहे. त्यामुळे आता या सगळ्यातून बाजी कोण मारणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमाचे आता शेवटचे काही आठवडे बाकी असून प्रत्येकजण जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे.