‘नवा गडी नव राज्य’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर, वर्षा आणि नंदूचं लग्न निर्विघ्न पार पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 06:16 PM2023-08-01T18:16:38+5:302023-08-01T18:20:22+5:30

'नवा गडी नवं राज्य' (Nava Gadi Nava Rajya) या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.

Nava gadi nav rajya marathi serial episodic | ‘नवा गडी नव राज्य’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर, वर्षा आणि नंदूचं लग्न निर्विघ्न पार पडणार?

‘नवा गडी नव राज्य’ मालिका उत्कंठावर्धक वळणावर, वर्षा आणि नंदूचं लग्न निर्विघ्न पार पडणार?

googlenewsNext

'नवा गडी नवं राज्य' (Nava Gadi Nava Rajya) या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आनंदी, राघव, रमा, वर्षा, चिंगी या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. मालिकेत वर्षा या पात्राच्या आयुष्यात तिला खूपच अडचणींचा सामना करताना पाहायला मिळाली होती. पण त्यानंतर तिच्यासाठी मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री करण्यात आली होती.  शिवानंद गावडे उर्फ नंदू हे नवीन पात्र मालिकेत पाहायला मिळत आहे. लवकरच वर्षा आणि नंदूचं लग्न होणार आहे. आता ही मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे.

 नुकताच आपण पहिला की, माधवरावांच्या म्हणजेच राघवच्या बाबांच्या आजारपणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, माधवरावांवर कर्जाचा मोठा डोंगर आहे. तर दुसरीकडे वर्षाच्या लग्नाची तयारी सुरु आहे. वर्षा आणि नंदू ची हळद सुरु असताना, नंदूची बहीण वर्षासाठी उष्टी हळद घेऊन येते. राघव बाबांना काही वेळासाठी लग्नसमारंभात घेऊन येण्याचं ठरवतो. हे बघून वसुलीवाले त्यांचा पाटलाख करतात, लग्नात विग्न आणण्याचा ठरवतात आणि नंदूच्या घरी पोहोचतात आता

मालिकेच्या आगामी भागात लग्नासाठी नंदू पोहोचेल का?, हे लग्न होईल का?, असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. प्रेक्षकांच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.  

Web Title: Nava gadi nav rajya marathi serial episodic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.