'नवरी मिळे हिटलरला' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, लीलाच्या हाती लागेल अंतराच्या मृत्यू मागचे सत्य ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 05:19 PM2024-07-18T17:19:25+5:302024-07-18T17:20:06+5:30

Navari Mile Hitlerla : 'नवरी मिळे हिटलरला' मालिका अनेक रंजक वळणं घेत आहे.

'Navari Mile Hitlerla' series at an exciting turn, the truth behind Antar's death will be in the hands of Leela? | 'नवरी मिळे हिटलरला' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, लीलाच्या हाती लागेल अंतराच्या मृत्यू मागचे सत्य ?

'नवरी मिळे हिटलरला' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, लीलाच्या हाती लागेल अंतराच्या मृत्यू मागचे सत्य ?

'नवरी मिळे हिटलरला' ( Navari Mile Hitlerla) मालिका अनेक रंजक वळणं घेत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. एजे आणि लीलाची जोडी प्रेक्षकांना भावते आहे. नुकतेच एजे आणि लीला यांचे लग्न पार पडले. त्यानंतर लीला आणि एजे पाचपरतावणीसाठी लीलाच्या माहेरी गेले असताना एजेला एक रात्र तिथे राहावे लागतं. एजेला काही गोष्टींचा त्रास होतोय पण काही गोष्टी त्याला नव्याने कळतात.

लीलाच्या आई बाबांसमोर एजे आणि लीला सुखी जोडपं असल्यासारखे वावरतायंत. एजे असं वागत आहेत हे पाहुन लीलाला खूप बरं वाटतं. पण किशोर तिला सतत आठवण करून देत आहे की तुला अंतराच्या मृत्यूचे पुरावे शोधायचे आहेत. त्यामुळे ती एजे कडे सतत साशंक नजरेने पाहत आहे. एजे लीला घरी परत आल्यावर लीला अंतराचं कपाट उघडायला जाते आणि एजे ते पाहतो.

अंतराच्या कोणत्याही गोष्टीला हात लावलेला त्याला आवडत नाही आणि तिथे या चुकीबद्दल एजे लीलाला शिक्षा करतो. काय असेल आहे अंतराच्या मृत्यूमागचं रहस्य ? लीला घेऊ शकेल का सत्याचा शोध ? एजे आणि लीलाच्या नात्यामध्ये फुलेल का प्रेमाची कळी? हे जाणून घेण्यासाठी 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका पाहावी लागेल.

Web Title: 'Navari Mile Hitlerla' series at an exciting turn, the truth behind Antar's death will be in the hands of Leela?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.