'नवरी मिळे नवऱ्याला', नवीन मालिका रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 07:15 AM2019-09-23T07:15:00+5:302019-09-23T07:15:00+5:30
लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या ४ मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाहीये. लवकरच सुरू होणाऱ्या नवरी मिळे नवऱ्याला या नव्या मालिकेतून ही समस्या प्रेक्षकांसमोर येणार आहे.
विविध आशयघन आणि दर्जेदार कथानक असलेले मराठीत मालिका रसिकांच्या भेटीला येत आहेत. सिनेमांप्रमाणे मालिकेतही नवनवीन प्रयोग केले जात आहेत. मग ते तंत्रज्ञानाच्या बाबतीत असो किंवा मग चित्रीकरण स्थळाबाबत. अशीच एक आगळी वेगळी गोष्ट मालिकेत पाहायला मिळणार आहे. 'नवरी मिळे नवऱ्याला', नवीन मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.
यंदा पावसाळा महाराष्ट्रावर पुरता बरसला असला, तरी मराठवाडा मात्र तहानलेला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी समस्या आणि ही समस्या आहे एका आईची. लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या ४ मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाहीये. लवकरच सुरू होणाऱ्या नवरी मिळे नवऱ्याला या नव्या मालिकेतून ही समस्या प्रेक्षकांसमोर येणार आहे.
आता तरी ठरलं पाहिजे, घर सुनांनी भरलं पाहिजे, एवढीच इच्छा असणाऱ्या या माउलीला मराठवाड्यातली परिस्थिती काही साथ देत नाही. एकीकडे नंदी बैलानं डोलावलेली नकारार्थी मान तर दुसरीकडे विवाह संस्थेकडून आलेला नकार, हे सगळं पचवून या वर्षी आपल्या मुलांची लग्नं करणारच, असा निश्चय तिनं केला आहे. सामाजिक समस्या विनोदी शैलीनं मांडण्यात हातखंडा असणारे दिग्दर्शक समीर पाटील या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. समीर पाटील याची प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून ओळख आहे. त्यामुळे त्यांनी मांडलेली या आईची व्यथा पाहताना धमाल येणार, हे मात्र नक्की