'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेतील अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्त, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 10:39 AM2024-05-05T10:39:29+5:302024-05-05T10:40:16+5:30

Nawari Mile Hitlerla Serial : 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतील एका अभिनेत्याला खऱ्या आयुष्यात कन्यारत्न प्राप्ती झाल्याने त्याचा हा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

'Nawari Mile Hitlerla' serial actor became father, shares good news | 'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेतील अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्त, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

'नवरी मिळे हिटलर'ला मालिकेतील अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्त, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' (Navari Mile Hitlerla) या मालिकेतील एका अभिनेत्याला खऱ्या आयुष्यात कन्यारत्न प्राप्ती झाल्याने त्याचा हा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हा अभिनेता म्हणजे अजिंक्य दाते (Ajinkya Date). अजिंक्य दाते याने नवरी मिळे हिटलरला मालिकेत विश्वरूपची भूमिका साकारली आहे. ३ मे रोजी मालिकेचे शूटिंग चालू असतानाच त्याला कन्यारत्न झाल्याची गोड बातमी कळली. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

अजिंक्य दातेने बाळाच्या हाताचे फोटो शेअर करत लिहिले की, "अरे चलो भाई फटाफट लाईटींग करो यार, विश्वरूपको निकलना है" असं म्हणत स्वतः त्यांच्या मागे लागत काम करून घेणारा आमचा लीड राकेश बापट. मला लवकर निघता यावं म्हणून अख्ख्या सीनचं स्ट्रक्चर माझ्या सोयीने करणारी आमची डिरेक्शन टीम...निघताना सावकाश जा,फोन करत रहा असं ठणकावून सांगणारी माझी सहकलाकार मंडळी आणि प्रोडक्शन टीम. हे सगळे का झटपट करत होते... काय झालं होतं.. असं कुठे जायचं होतं मला...तर कारण होतं आमच्या कुटुंबात दाखल होणाऱ्या नव्या मेंबरच्या एन्ट्रीचं...

त्याने पुढे लिहिले की, प्राचीला १ मे ला सकाळीच ६ वाजता चिंचवडच्या कामत हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं(तशी तिची तारीख १९/२० मे दिली होती) दिवसभरात काहीच घडलंच नाही... दुसर्‍या दिवशी २ मे ला मला शुटींगला जाणं भाग होतं कारण तिथेही एपिसोड 'अडकले' होते... पुण्याहून ठाण्यात स्टुडिओत पोहचल्यावरही सगळं लक्ष फोन कडेच होतं...सीन होत होते...बाहेर गरमी आणि माझं टेन्शन टॉपवर होतं... दुपारी साडेचार पाचच्या दरम्यान फोन आला आणि आमच्या मेव्हणीबाईंनी बायकोच्या लेबर पेनचा आवाज ऐकवला... उरलंसुरलं आवसान गळून गेलं... आणि मग घडला तो सुरुवातीला लिहीलेला तो प्रसंग... मग शुटींग संपवून गाडीने जो निघालो तोच वाटेत फोन आला की "अभिनंदन... बाप झालास... मुलगी झाली" बास....त्यानंतर मी गाडी चालवत पोचलो की हवेवर तरंगत मला नाही माहित.... इतकं भारवून जाणं या आधी कधीच घडलं नव्हतं...

इतकं क्युट काहीतरी घडतंय आणि...

फायनली जेव्हा पोहचलो आणि पोरीला बघितलं तेव्हा एकच फिलिंग होतं "और यहा मे पिघल गया" स्वतःला बेरड समजायचो... 'आपन रडत नसतोय' याचा उगाच माज करायचो पण तो खोटा आहे हेही कळ्ळं.. इतकं क्युट काहीतरी घडतंय आणि तेही माझ्या आयुष्यात यावर खरंच विश्वास बसत नव्हता... आम्हाला मुलगी झाली पण तिने आई, बाबा, आजी आजोबा, मावशी, मामा, आत्या, काका अशी बक्कळ नाती जन्माला घातली... आणि आणि आणि आज ३ मे... आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस इतका खास कधीच होऊ शकत नाही... बायको... लयीच कम्माल गिफ्ट दिलंस... मोक्कार खुश आहे आपन... लव यु...प्राची पाचघरे, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
 

Web Title: 'Nawari Mile Hitlerla' serial actor became father, shares good news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.